sanguem school ceiling collapse Dainik Gomantak
Video

Sanguem: माकडाच्या उड्येन, कशें कोसाळ्ळें सिलिंग? Watch Video

Sanguem school ceiling collapse: सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील सभागृहाचा सिलिंगचा काही भाग कोसळून पाच विद्यार्थी जखमी होण्याची घटना घडली.

Sameer Panditrao

सांगे: वाळपई येथील शाळेच्या वर्गात गुरुवारी (ता.९) सिलिंग फॅन पडल्याची घटना ताजी असतानाच सांगे येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील सभागृहाचा सिलिंगचा काही भाग कोसळून पाच विद्यार्थी जखमी होण्याची घटना घडली.

पाचही जखमी विद्यार्थ्यांना तातडीने प्राचार्य सुदेश नाईक व इतर शिक्षकांनी प्रथमोपचार करून सांगे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता पुढील तपासणी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवून देण्यात आले आहे.

सविस्तर घटनेनुसार, उच्च माध्यमिक शाळेच्या छपराला ॲल्युमिनियमचे सिलिंग जोडण्यात आले होते. त्यापैकी काही भाग यापूर्वीच कोसळला होता. तर आता त्यातील काही भाग सकाळी १०.३० वाजता कोसळून पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत. या हायरसेकंडरीच्या छपराचा आतील भाग उघडा असून लोखंडी जाळी न बसविल्यामुळे माकड आत घुसून छपरावर नाचतात त्यामुळे सिलिंग कोसळले. शिवाय अशीच घटना यापूर्वीही घडलेली असून या घटनेची माहिती यापूर्वीच शिक्षण खात्याला व सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आलेली आहे. आता दुसऱ्यांदा सिलिंग कोसळण्याची घटना घडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कौटुंबिक वादांवरील धोरण स्वागतार्ह, पण 'नोकरशाहीचा अडथळा नको' - आपची मागणी

Goa Crime: 'हॅलेलूया' म्हणणे नडले! हणजूण 'संडे मास'शी टेक्नो पार्टीची जाहिरात जोडणाऱ्यावर गुन्हा दाखल

Mapusa Crime: 22 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; ब्लॅकमेल करून पैसे लुटल्याची धक्कादायक घटना

Goa Rain: परतीच्या पावसाचा कहर! सत्तरीत वादळी वाऱ्यासह जबर तडाखा, वाळपईत ढगफुटी; Watch Video

Narkasur in Goa: "माझा मृत्यू..." नरकासुराने केली होती अनोखी मागणी, अजूनही गोव्यात का चालते दहनाची परंपरा?

SCROLL FOR NEXT