Goa Crime: 'हॅलेलूया' म्हणणे नडले! हणजूण 'संडे मास'शी टेक्नो पार्टीची जाहिरात जोडणाऱ्यावर गुन्हा दाखल

Anjuna man booked: व्हागातोर येथील सेंट अँथनी चर्चचे धर्मगुरू फादर मार्सेलिनो डी सूझा यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली
Anjuna Man Booked
Anjuna Man BookedDainik Gomantak
Published on
Updated on

हणजूण: सोशल मीडियावर एका 'टेक्नो पार्टी'ची जाहिरात 'संडे मास' या ख्रिस्ती धार्मिक विधीशी जोडल्यामुळे एका स्थानिक रहिवाशाविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नेमका गुन्हा काय घडला?

व्हागातोर येथील सेंट अँथनी चर्चचे धर्मगुरू फादर मार्सेलिनो डी सूझा यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, हणजूण येथील विजय अरोरा (वय ४५) या आरोपीने एका पार्टीची जाहिरात पोस्ट केली होती.

या जाहिरातीमध्ये असे लिहिले होते:

"शनिवार रात्री-रविवार सकाळी नॉईस गोवा येथे रविवार सकाळच्या प्रार्थना सोबत योग्य टेक्नो ध्वनी वाजवत आहेत... हालेलया म्हणा."

धार्मिक विधी आणि पार्टीची जाहिरात एकत्र केल्यामुळे ही पोस्ट ख्रिश्चन समुदायाच्या धार्मिक भावना दुखावणारी असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. हा प्रकार हेतुपुरस्सरकरण्यात आला, असे तक्रारीत नमूद आहे.

Anjuna Man Booked
South Goa Hospital: द.जिल्हा इस्पितळात 10 दिवसांत भरती! मंत्री राणेंनी दिली माहिती; 50 परिचारिका, अधिकारी, डॉक्टरांची होणार नियुक्ती

पोलिसांची कारवाई आणि पुढील तपास

या तक्रारीच्या आधारावर, पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, आरोपी विजय अरोरा याला बीएनएसएसच्या कलम ३५(३) नुसार नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हणजूण पोलीस करत आहेत. धार्मिक विधीचा उल्लेख व्यावसायिक जाहिरातीत करून समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com