Sanguem Fire Incident Dainik Gomantak
Video

Sanguem Fire News: सांगेत लागलेली ती' आग नियंत्रणात आणण्याचे काम अद्याप सुरूच

Sanguem Fire Incident: रासायनिक धूर अत्यंत उग्र असल्याने आगीच्या ठिकाणी तसेच गावातील लोकांनी मास्क वापरावे लागले. लोक पंचायत मंडळाला दोषी ठरवीत आहे.

Sameer Panditrao

सांगे: चानीमळ, कष्टी, काले येथील बंद चिरेखाणीत साठवलेला औद्योगिक वसाहतीतील प्लास्टिक कचऱ्याला शनिवारी लागलेली आग अजूनही धुमसत आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ८० टक्के आग पाणी आणि मातीचा भराव घालून विझविण्यात आली. शिल्लक काम उद्यापर्यंत पूर्णपणे आटोक्यात येईल, असा विश्वास सांगेचे उपजिल्हाधिकारी मिलिंद्र वेळीप यांनी व्यक्त केला. तसेच दोषींवर योग्य कारवाई करण्याचे निर्देश कुडचडे पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या तीन दिवसांपासून धुमसणाऱ्या आगीवर उपाययोजनेसाठी सांगेचे प्रशासन धावपळ करीत आहे. एका बाजूने रासायनिक धूर व दुसऱ्या बाजूने धुराने त्रस्त झालेले ग्रामस्थ एकाच वेळी आकांडतांडव करीत असताना उपजिल्हाधिकारी आपल्या पद्धतीने ग्रामस्थांना आश्वस्त करीत होते.

आग लागलेल्या ठिकाणापासून जवळपासची लोकवस्ती इतरत्र नागरिक, नातेवाईक यांच्या घरी स्थलांतर झाले आहे. रासायनिक धूर अत्यंत उग्र असल्याने आगीच्या ठिकाणी तसेच गावातील लोकांनी मास्क वापरावे लागले. लोक पंचायत मंडळाला दोषी ठरवीत आहे. सरपंच बबन गावकर म्हणाले की, कचऱ्याचा ढीग पाहता ही घटना कालची नसून किमान चार पाच वर्षांपासून प्लास्टिक कचरा साठविला जात असावा. मात्र या संदर्भात एकही लेखी तक्रार ग्रामस्थांनी पंचायतीला दिली असल्याची नोंद पंचायत कार्यालयात नसल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT