Salaulim Pipeline Burst Dainik Gomantak
Video

Salaulim Pipeline Burst: पारोडा येथे साळावलीची मुख्य पाण्याची पाईपलाईन फुटली; लाखो लिटर पाणी गेले वाया

Salaulim Pipeline Burst: मूळस पारोडा येथे जलस्रोत खात्याचे सफाईचे काम सुरु असताना मुख्य जलवाहिनीचा ‘व्हॉल्व’ तुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.

Manish Jadhav

मूळस पारोडा येथे जलस्रोत खात्याचे सफाईचे काम सुरु असताना मुख्य जलवाहिनीचा ‘व्हॉल्व’ तुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. सदर व्हॉल्व तुटताचा पाण्याचा उंच फवारा उडल्याने मुख्य जलवाहिनी फुटल्याची लोकांमध्ये चर्चा सुरु होती. सदर पाणीपुरवठा पूर्ववत सुरु करण्यासाठी काम सुरु होते, हे काम काल (11 मार्च) रात्री उशिरापर्यंत पूर्ण होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सांगितले आहे.

पारोडा गावातून साळावलीचा पाण्याचा मुख्य कालवा गेला असून त्याला बरीच वर्षे झाल्याने सध्या त्याचे दुरुस्तीकाम सुरु आहे. बुधवारी दुपारी 12 वाजता मूळस-पारोडा येथे सदर काम सुरु असताना दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व्ह मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्याने त्याचा अंदाज जेसीबी चालकाला न आल्याने त्यांनी सदर माती हटवण्याचा प्रयत्न केला असता सदर व्हॉल्व्ह तुटून आल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून लाखो लिटर पाणी वाया गेले.

मडगाव कार्यालयाचे अधिकारी घटनास्थळी धाव घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणीपुरवठा बंद करुन दुरुस्ती कामाला सुरुवात केली. पाणीपुरवठा बंद केल्याने दक्षिण गोव्यातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. व्हॉल्व्ह बसवण्याचे काम सुरु असून रात्री उशिरापर्यंत हे काम पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT