Chimbel Unity Mall Dainik Gomantak
Video

Chimbel Protest: आदिवासींच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न हाणून पाडू; गोविंद शिरोडकर Watch Video

Chimbel Unity Mall: राज्‍य सरकार आदिवासींच्या जमिनी हडप करण्यास निघाले आहेअसा आरोप चिंबलच्या जैव विविधता समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी केला.

Sameer Panditrao

पणजी: राज्‍य सरकार आदिवासींच्या जमिनी हडप करण्यास निघाले आहे. यासाठी हेतूतः आदिवासी बहुल भाग करत आहे, असा आरोप चिंबलच्या जैव विविधता समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी केला. गोमन्तकचे संपादक संचालक राजू नायक यांनी त्यांची सडेतोड नायक सदरात गोमन्तक टीव्हीसाठी आज मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला.

गेल्या २४ दिवसांत एकाही आदिवासी मंत्री आमदाराने साधा पाठिंबा देण्यासाठीही भेट दिली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तोयार तळे वाचवणे म्हणजे परिसरात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वाचवण्यासारखे आहे. आमचे अस्तित्वच त्यावर अवलंबून आहे. वाढत जाणारी खासगी वस्ती, चिंबलच्या पठारावरून काढलेला महामार्ग ही संकटे आम्ही झेलत असताना सरकारने हे संकट आमच्‍यासमोर उभे केले आहे. आम्ही याआधी सरकारला युनिटी मॉल व प्रशासन स्तंभ या प्रकल्पांना विरोध कायम असेल याची कल्पना दिली आहे. चर्चा करता येईल पण आम्ही आमच्या भूमिकेपासून माघारी येऊ असा त्याचा अर्थ होत नाही, असे त्यानी सांगितले.

विविध आमिषे....

ते म्हणाले, तळ्याच्या प्रभाव क्षेत्रात कोणतेही बांधकाम नको असे आमचे म्‍हणणे आहे. हा आदिवासी समाज वाचवण्याचा व्यापक लढा आहे. केवळ तो एका प्रकल्पाला विरोधापुरता मर्यादित नाही. ५० हजार चौरस मीटर जमिनीवर कॉंक्रीट घातल्यानंतर तळे टिकेल का याचा विचार कोणीही करावा. जिल्ह्यातील एक उत्पादन विकण्यासाठी मॉलची गरज नाही असे आमचे म्हणणे आहे, त्यावर आम्ही ठाम आहोत. आपल्याला या लढ्यातून बाहेर पडण्यासाठी काही जणांनी विविध आमिषेही दाखवली होती, असा आरोपही त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Academic Calender: 'विद्यार्थ्यांनो लक्ष द्या'! गोव्यात 1 एप्रिलपासून वाजणार शाळेची घंटा; नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर

Goa Cylinder Stock: '15 दिवस पुरेल इतका सिलिंडरचा साठा उपलब्ध', मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती; केंद्राला पाठवणार राज्याचा अहवाल

अमेरिकेचा भारताला 'सॅल्युट'! तेल बाजारातील स्थिरतेसाठी मोदी सरकारची भूमिका ठरली निर्णायक; अमेरिकन राजदूतांकडून तोंडभरुन कौतुक

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

SCROLL FOR NEXT