Sadetod Nayak  Dainik Gomantak
Video

Goa Recruitment: भरतीसाठी 'आयोगच' योग्य उपाय! वेर्णेकर, कुएल्हो यांनी मांडली भूमिका

Sadetod Nayak Cash For Job: ‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक यांनी नोकरी घोटाळ्याच्या मुद्यावर ‘आप’ आणि भाजपची भूमिका जाणून घेण्यासाठी भाजपचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर आणि ‘आप’तर्फे फ्रान्सिस कुएल्हो यांच्याशी संवाद साधला.

गोमन्तक डिजिटल टीम

Staff Recruitment Commission Goa Amidst Cash For Job

पणजी: कर्मचारी भरती आयोगाची अंमलबजावणी काही वर्षांपासून रखडली होती आणि आता ती मार्गी लागत असल्याने सर्व राजकीय नेते अस्वस्थ झाले आहेत, तरीदेखील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आयोग कार्यरत केला आहे.

या आयोगामार्फत नोकरभरती प्रक्रिया पारदर्शकपणे केली जाणार आहे. आयोगाने परीक्षा आणि निकाल एकाच दिवशी जाहीर करण्याची योजना केली आहे, ज्यामुळे पारदर्शकता सुनिश्चित होईल, असा निष्कर्ष ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात काढण्यात आला.

‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक यांनी नोकरी घोटाळ्याच्या मुद्यावर ‘आप’ आणि भाजपची भूमिका जाणून घेण्यासाठी भाजपचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर आणि ‘आप’तर्फे फ्रान्सिस कुएल्हो यांच्याशी संवाद साधला.

‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात काही महिलांचा संबंध भाजपशी जोडला जात आहे. यावर वेर्णेकर यांनी सांगितले की, त्या महिलांचा भाजपशी कोणताही संबंध नाही. जर भाजपचा कोणी सदस्य दोषी ठरला, तर त्याला पक्षातून काढून टाकण्यात येईल. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षांवर आरोप होत असल्याबद्दल स्पष्टीकरण देताना वेर्णेकर यांनी ते आरोप ''खोटे'' असल्याचे सांगितले आणि पुरावे सादर करा, असे आव्हान दिले. फ्रान्सिस कुएल्हो यांनी मात्र या आरोपांचे खंडन करून पुरावे सरकारने शोधले तर ते मिळतील, असे ठामपणे सांगितले.

...मग ते माफी मागतात ः पै वेर्णेकर

गिरिराज पै वेर्णेकर यांनी ‘आप’वर खोटे बोलण्याचे आरोप केले. ते म्हणाले की, ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल खोटे बोलून काही सिद्ध करू शकत नाहीत, तेव्हा ते जाहीर माफी मागतात. ‘आप’च्या नेत्यांनी आजवर लोकांना असेच फसवले आहे. ते केवळ बोलतात, मात्र त्यांच्याकडे पुरावे मागितले की, ते माफी मागू लागतात.

सरकारनेच पुरावे शोधावेत; कुएल्हो

‘आप’ने दिल्लीतील पत्रकार परिषदेत भाजप सरकारवर ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात आरोप केले आणि त्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांची पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यावरही शरसंधान केले. वेर्णेकर यांनी या आरोपांचे खंडन करत ‘आप’ पुरावे असल्यास ते सादर करावेत, असे सांगितले, परंतु फ्रान्सिस कुएल्हो यांनी त्यांना पुरावे नसल्याचे सांगून सरकारने त्यांचे पुरावे शोधावेत, असे प्रत्युत्तर दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

घरात भांडण करुन पळाले, कच्छच्या जंगलात गाववाल्यांनी पकडले, अल्पवयीन पाकिस्तानी जोडप्याने प्रेमासाठी पार केली देशाची सीमा

Fishing Boat Accident: काणकोणातील राजबाग किनाऱ्यावर पुन्हा बोट उलटली, स्थानिक मदतीसाठी धावले!

Viral Video: बिहारमधून दिसू लागला हिमालय आणि माऊंट एव्हरेस्ट; मनमोहक व्हिडिओ आला समोर Watch

Goa Politics: आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत याची गॅरंटी द्या! ‘आप’चा काँग्रेससोबत युतीस स्पष्ट नकार

Shubhman Gill: "त्यांनी भारताला स्वबळावर अनेक सामने जिंकून दिले, आम्हाला त्यांची गरज..." नवा कर्णधार शुभमन गिलचे रोहित-विराटबाबत मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT