Rohit Monserrate X
Video

Panaji: पणजी स्वच्छ, सुंदर व्हावी, महोत्सवाची नगरी बनावी; 'स्मार्ट सिटी'वरती महापौर मोन्सेरात यांचा कौतुकाचा वर्षाव

Rohit Monserrate: राजधानी पणजी स्वच्छ, सुंदर व्हावी, महोत्सवाची नगरी बनावी, आलेल्या पर्यटकाला आल्हाददायक अनुभूती देणारी ठरावी, तिचा सर्वांना हेवा वाटावा यासाठी तिला बहुआयामी बनवायचे माझे लक्ष्य आहे. त्यासाठीच मी व माझे सहकारी कार्यरत असल्याचे पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Rohit Monserrate Mayor Panaji

पणजी: राजधानी पणजी स्वच्छ, सुंदर व्हावी, महोत्सवाची नगरी बनावी, आलेल्या पर्यटकाला आल्हाददायक अनुभूती देणारी ठरावी, तिचा सर्वांना हेवा वाटावा यासाठी तिला बहुआयामी बनवायचे माझे लक्ष्य आहे. त्यासाठीच मी व माझे सहकारी कार्यरत असल्याचे पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले.

‘गोमन्तक’च्या कार्यालयात सदिच्छा भेटीसाठी आले असता महापौर रोहित मोन्सेरात यांनी दिलखुलासपणे विविध विषयांवर आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक व ‘गोमन्तक’च्या इतर कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी संपादक-संचालक राजू नायक यांनी गोमन्तक आणि पणजी महानगरपालिका यांच्या संयुक्त सहकार्यातून पणजीतील स्वच्छतेसंबंधी जनजागृती उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला मोन्सेरात यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला.

दरम्यान, मोन्सेरात म्हणाले की, मी देश-विदेशातील अनेक शहरांमध्ये फिरलो आहे; परंतु जो आनंद आपले पणजी शहर देते तो इतर कोणत्याच शहरात नाही. त्यामुळे नागरिकांना सुंदर पणजी देण्यासाठी आम्ही झटत आहोत. जर तुम्ही पहाटे पणजीत फिरलात तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात कचरा आढळून येईल; परंतु आमच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सकाळी ८ पूर्वीच सर्व पणजी स्वच्छ केली जाते. पणजी महानगरपालिकेकडून पणजीच्या हितासाठी अनेक उपक्रम राबविले जातात; परंतु आम्ही प्रसिद्धीपेक्षा आमचे काम करत राहणे योग्य समजतो.

समस्येकडे लक्ष वेधताचतत्काळ घेतला आढावा

ज्यावेळी हिरा पेट्रोल पंपशेजारील कचरा व्यवस्थापनाबाबत महापौर मोन्सेरात यांना विचारले असता त्यांनी तत्काळ तेथील अधिकाऱ्यांना फोन करून दुर्गंधीसंंबंधी अनेक तक्रारी येत असल्याचे सांगत यावर जे काही उपाय करता येतील ते करा असे सांगितले. आपण याप्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून योग्य त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न करेन, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

पणजी ठरते आहे महोत्सवांचे शहर

‘सेरेंडिपिटी’सारखा जागतिक महोत्सव सध्या आपल्या राजधानीत होतो. आयोजकांना अपेक्षित सहकार्य भेटत नव्हते. त्यांना इतर देशांतून आयोजनासाठी निमंत्रणे येत होती; परंतु माझ्या प्रयत्नांमुळे हा जागतिक महोत्सव पणजीत राहिला. सेरेंडिपिटी महोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत राजधानीत अनेक देश-विदेशातील नागरिक दाखल होत असतात. त्या काळात सेरेंडिपिटीमुळे हॉटेल तसेच इतर व्यावसायिकांचा व्यवसाय होतो, असे महापौरांनी सांगितले.

महापालिकेला दोष देणे सोपे; पण...

अनेकांना सर्व काही फुकट मिळावे असे वाटते. पणजी मार्केटमधील अनेक गाळे भाडे न भरता मागील अनेक वर्षे वापरत होते. ते करार करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. पाणी, वीज फुकट वापरत असल्यामुळे आम्हाला सुमारे ३०-४० कोटींचे नुकसान झाले. इतक्या पैशांतून आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांचे वर्षाचे वेतन देता आले असते.

नवीन मार्केटमधील तिसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू केले जाईल. त्या इमारतीची अवस्था कशी झाली होती हे सर्वांना माहिती आहे. इमारत मोडकळीस आल्याने काही बरे वाईट झाले असते तर आम्हालाच दोष दिला असता. महापालिकेला दोष देणे सोपे असते; पंरतु काही निर्णय हे नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने घ्यायचे असतात, असे महापौरांनी सांगितले.

सायकल लेन सुरू करणे कठीण!

राजधानी पणजीत सायकल लेन सुरू करावी, अशी मागणी होत आहे; परंतु पणजीत इतर वाहनांसोबत सायकलिंग करता येणार नाही. इतर वाहनांसोबत सायकल चालविल्यास सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित होईल. त्यामुळे त्यासाठी वेगळी व्यवस्थाच करावी लागेल. रविवारी नागरिकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम राबविल्यास त्यासाठी महानगरपालिका निश्‍चितपणे सहकार्य करेल, असे महापौर रोहित मोन्सेरात यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT