पणजी: गोवा वाचवा असे ज्यांना वाटते, जे प्रामाणिकपणे काम करतात. गोव्यातील जमिनी वाचवण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ‘आरजीपी’शी जोडले जावे, असे आवाहन रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाच्या नेत्यांनी केले. पक्षाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस अध्यक्ष मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांची उपस्थिती होती.
परब म्हणाले, गोव्यात भाजप, काँग्रेस व आम आदमी पक्ष या तीन राष्ट्रीय पक्षांचे हायकमांड हे दिल्लीत आहेत, त्यांची धोरणे ही दिल्लीत ठरली जातात. ‘इंडिया’ आघाडी दिल्लीतील विधानसभेला दिसून आली नाही, त्यामुळे त्याचा फायदा भाजपला झाला आहे.
गोव्यात भाजप आणि आपने केवळ ‘आरजीपी’ला ‘बी टीम’ म्हणून हिनवले. दिल्लीतील निकाल पाहिल्यास आपच्या १५ उमेदवार पडण्यास काँग्रेसच्या उमेदवारांची मते कारणीभूत असल्याचे दिसून येते.
भाजपला ४६ टक्के, आपला ४४ टक्के मते पडली आहेत. काँग्रेसला केवळ ६ टक्के मते मिळाली आहेत, त्यामुळे यावरून भाजपची ‘बी टीम’ कोणती आहे, हे स्पष्ट दिसते. इंडिया आघाडीचे नेते पुन्हा निवडून आल्यास भाजपमध्ये उडी मारण्यास सर्वात पहिले असतील, असेही त्यांनी निक्षून सांगितले.
बोरकर म्हणाले, जमीन वाचविण्यासाठी आम्ही पोगो विधेयक आणले होते, पण या कायद्याला कोणत्याही पक्षातील आमदार पाठिंबा देत नाही. गोव्यातील आमदारांना राज्याचे काहीच पडलेले नाही. दिल्लीतील लोकांना विविध पक्षातील नेते जमीन विक्रीचे व्यवहार करीत आहेत.
स्वतःचा स्वार्थ साधून इतर पक्षातील आमदार पुढे जात आहेत. राज्यातील जमिनी कशा हडपल्या आहेत, हे सर्वांना कळाले असावे. प्रामाणिकपणे काम करीत आहेत, त्यांनी गोवा वाचवण्यासाठी ‘आरजीपी’बरोबर यावे असे आवाहन त्यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.