rabies free Goa Dainik Gomantak
Video

Mission Rabies: रेबीज मुक्तीसाठी बार्देशमध्ये गोवा सरकार जनजागृतीसह राबवणार मोहिम; शंभर टक्के लसीकरणचे उद्दिष्ट

Rabies Vaccination Goa: देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात ‘रेबिज वॅक्सिनेशन अँड स्टॅबिलायझेशन’ ही मोफत लसीकरण मोहीम राबवली जात आहे.

Sameer Panditrao

पणजी: देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात ‘रेबिज वॅक्सिनेशन अँड स्टॅबिलायझेशन’ ही मोफत लसीकरण मोहीम राबवली जात आहे. महाराष्ट्र सीमेलगत असल्याने धोका टाळण्यासाठी आणि रेबिज नियंत्रणासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या असून बार्देश तालुक्यात ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जाणार असल्याची माहिती मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

बार्देश तालुका मोठा असल्याने येथे मोहीम पूर्ण झाल्यानंतर इतर ठिकाणीही ती हाती घेतली जाणार आहे. कोलवाळ येथील श्रीराम विद्यामंदिर येथे उद्यापासून मोहिमेची सुरवात होईल. मोहिमेचा कालावधी आठ दिवस असला, तरी शक्य तितक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन डब्ल्यूव्हीएस आणि एमआर संस्थांच्या सहकार्याने कुत्र्यांचे स्टरलायझेशन आणि लसीकरण केले जात आहे. यासाठी जवळपास १५०० जणांचे मनुष्यबळ तैनात केले जाणार आहे. या मोहिमेत १२ आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ तसेच १९ स्वयंसेवकांचा समावेश असून,विशेष प्रशिक्षित

कर्मचारी गणवेशात कार्यरत असतील. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात ही मोहीम राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज असून सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध असल्याचे मंत्री हळर्णकर यांनी स्पष्ट केले. दरवर्षी या मोहिमेसाठी २ कोटी रुपये मंजूर होत असून अनेक बिगर सरकारी संस्था देखील सक्रियपणे या कार्यात मदत करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahadevi Elephant: जनतेनं संघर्ष टाळावा, आमच्यासोबत उभं राहावं; वनतारानं स्पष्ट केली भूमिका; नेमकं काय केलंय आवाहन?

Friendship Day 2025: फ्रेंडशिप डे स्पेशल! तुमच्या जिगरी मित्राला पाठवा 'हे' खास संदेश

IND vs ENG: फलंदाजीतही 'दीप' चमकला! आकाश दीप विराट-सचिनच्या खास क्लबमध्ये सामील; अशी कामगिरी ठरला चौथा भारतीय खेळाडू

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT