Kelosim Gramsabha  Dainik Gomantak
Video

Quelossim Gramsabha: आशिष नेहरा प्रॉपर्टीप्रकरणी केळशी ग्रामसभा तापली

Ashish Nehra: माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा याने पंचायतीची परवानगी न घेता रस्ता बांधल्याचे यावेळी सांगण्यात आले. पंचायतीने त्याला पत्र लिहून हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे व ती जागा पूर्ववत करण्यास सांगितले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Quelossim Gramsabha

सासष्टी: केळशी ग्रामसभेत आज कार्यक्षेत्रातील बांधकामांवरून दोन गटांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले. माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा याने पंचायतीची परवानगी न घेता रस्ता बांधल्याचे यावेळी सांगण्यात आले. पंचायतीने त्याला पत्र लिहून हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे व ती जागा पूर्ववत करण्यास सांगितले आहे. या ग्रामसभेत ‘सनबर्न’ला विरोध दर्शविणारा तसेच रोमी कोकणीला समान दर्जा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

सरपंच डिक्सन वाझ म्हणाले की, ज्या लोकांना गावाबद्दल प्रेम आहे, ते आज उपस्थित होते. आम्हाला गावाचा विकास हवा; पण तो शाश्वत असावा. कित्येकांनी दहा-पंधरा वर्षांपूर्वी येथे जागा विकत घेतल्या आहेत. आता तिथे ते काय करणार, हे आम्ही सांगू शकत नाही. केळशी किनाऱ्यावर शॅक, वॉटर स्पोर्टस आहेत; शिवाय मच्छीमारांना किनाऱ्यावर ये-जा करण्यासाठी त्यांच्या जमिनीतून पूर्वीपासूनची पायवाट आहे. त्यामुळे जे कोण आपल्या जमिनीत बांधकाम करणार आहेत, त्यांनी प्रथम पंचायतीकडून परवानगी घ्यावी, तसेच लोकांना ये-जा करण्यासाठी जागा सोडावी, असा निर्णय बैठकीत झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT