Cuncoliem Mardol Local Oppose Mega Housing Project Dainik Gomantak
Video

Cuncoliem News: कुंकळ्‍येवासीय एकवटले! भूखंड विक्रीस तीव्र विरोध; इशाऱ्याचा फलकच टांगला वेशीवर

Priol Cuncoliem: प्रियोळ मतदारसंघातील कुंकळ्ये गावात जमिनीचे भूखंड पाडून ते विकण्यास स्थानिकांनी तीव्र विरोध केला. यासंबंधी येथील श्री केळबाई देवालयाच्या मंडपात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्थानिकांनी ठाम विरोध दर्शविला.

गोमन्तक डिजिटल टीम

Priol Cuncoliem Mardol Local Oppose Mega Housing Project

मडकई: प्रियोळ मतदारसंघातील कुंकळ्ये गावात जमिनीचे भूखंड पाडून ते विकण्यास स्थानिकांनी तीव्र विरोध केला. तर, बेताळभाटीतही ग्रामस्‍थांनी मेगा प्रकल्‍पांना विरोध करताना त्‍याविरोधात कठोर भूमिका घेतली.यासंबंधी आज कुंकळ्ये येथील श्री केळबाई देवालयाच्या मंडपात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्थानिकांनी ठाम विरोध दर्शविला. तसेच कोणी भूखंड घेण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडला जाईल, असा इशारा दिला. खुद्द ग्रामपंचायतीचा या प्रकाराला विरोध असल्याचे सांगण्यात आले. तसेच या विरोधाच्या प्रती संबंधित सरकारी खाती, स्थानिक आमदार, मुख्यमंत्री व राज्यपालांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

गर्भित इशाऱ्याचा फलकच टांगला वेशीवर

‘‘कोणी गावातील भूखंड विकत घेण्याचा प्रयत्न करत असेल तर ती त्यांची स्वतःची जबाबदारी असेल. अगोदर कल्‍पना दिली नाही, असे नंतर म्हणू नका’’ अशा आशयाचा फलकच गावच्या वेशीवर टांगला आहे. तसेच गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला.

काय आहे प्रकरण?

१. कुंकळ्ये येथील सुमारे ९९ हजार चौरस मीटर जमीन एका बांधकाम व्यावसायिकाला विकण्यात आली आहे. हा व्यावसायिक त्‍या जमिनीचे भूखंड पाडून ते विकण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण कुंकळ्येवासीयांना लागली.

२. ६ रोजी गावात झालेल्या सभेत स्थानिकांनी अशा भूखंड विक्रीला तीव्र विरोध दर्शविला. अशा प्रकारे भूखंड पाडून ते विक्री केल्यास भलतेच लोक येऊन गावात स्थायिक होतील आणि येथील शांती, जलस्रोत नष्ट होतील अशी भीती व्‍यक्त केली.

३. ही बागायती जमीन असल्याने त्याचे रूपांतरण करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. ९९ हजार चौरस मीटर जमिनीपैकी अवघीच काही जमीन भूरूपांतरित आहे. मात्र इतर सर्व जमीन बागायती आहे.

गावाची समृद्धी महत्त्‍वाची आहे. अशा प्रकारे भूखंड पाडून ते विक्री करण्यास ग्रामपंचायतीचा विरोध आहे. पंचायत ग्रामस्थांच्या बाजूने आहे.
हर्षा गावडे, सरपंच
गावाची नैसर्गिक समृद्धता नष्ट करण्याचा हा प्रकार आहे. ग्रामस्थ असा प्रकार कधीच खपवून घेणार नाहीत. अगोदर गावाचा हिताला प्राधान्‍य असेल.
संजीव कुंकळ्येकर, बागायतदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

Rashi Parivartan Yog 2026: धनलाभ अन् प्रगतीचा योग! 'राशिपरिवर्तन योगा'ने 5 राशींच्या लोकांचे स्वप्न होणार पूर्ण; रातोरात चमकणार नशीब

Singer Death: मनोरंजन विश्वात खळबळ! रॉक संगीताचा दिग्गज काळाच्या पडद्याआड; फरहान अख्तर, विशाल ददलानी भावुक

SCROLL FOR NEXT