Goa Cash For Job Scam Dainik Gomantak
Video

Pooja Naik: 'कॅश फॉर जॉब' घोटाळा, सुदीन ढवळीकरांचं नाव घेत पूजाने केला धक्कादायक खुलासा

Goa Cash For Job Scam: मुख्य आरोपी म्हणून समोर आलेल्या पूजा नाईक हिने धक्कादायक खुलासा केला आहे.

Sameer Amunekar

गोव्यात गाजत असलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळ्याला आता नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून समोर आलेल्या पूजा नाईक हिने धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितलं की या रॅकेटमध्ये एकूण नऊ जणांची टीम कार्यरत होती आणि त्यापैकी काही जणांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. या घोटाळ्याबाबत सत्य बाहेर आणण्यासाठी तिने इतर सहकाऱ्यांनाही पुढे यायला सांगितलं होतं. मात्र, इतर आरोपींनी पुढे येऊन माहिती देण्यास नकार दिला, असा खुलासा तिने केला आहे.

पूजा नाईकने दावा केला आहे की या प्रकरणात उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा थेट सहभाग होता. तिच्या आरोपानुसार, मंत्री सुदिन ढवळीकर यांनी तिला आयएएस अधिकारी निखिल देसाई तसेच प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांच्याशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले.

या समन्वयाचा उद्देश भरती प्रक्रिया सुरळीत ठेवणे असल्याचा दावा तिने केला आहे. मात्र पूजाच्या म्हणण्यानुसार, या समन्वयाच्या आडून मोठ्या प्रमाणात पैसे हस्तांतरित करण्यात आले.DD

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Municipal Election: महापालिका निवडणूक; बाबूश यांना घेरण्याची तयारी, विरोधकांची 'एकसंध' मोर्चेबांधणी; उत्पलकडे नजरा...

Omkar Elephant: ...अखेर 'ओंकार' आपल्‍या कळपात, वन अधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्र्वास

Louis Berger Case: लुईस बर्जर लाच प्रकरण; 'त्या' 3 साक्षीदारांना आरोपी करण्याची मंत्री कामतांची मागणी न्यायालयानं फेटाळली

Goa Politics: खरी कुजबुज; आमदार असावा तर असा!

रोशन रेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; वेगळ्या शाईने 'हाऊस नंबर', बार, नाईट क्लब शब्द घुसवले; न्यायालयात युक्तिवाद

SCROLL FOR NEXT