Ponda Dainik Gomantak
Video

Ponda: केरये खांडेपार येथे नदीत उडी घेऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली

Ponda Women Suicide Attempt: केरये, खांडेपार येथे एका महिलेने नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, फोंडा पोलिसांनी प्रसंगावधान राखून आणि तातडीने केलेल्या कारवाईमुळे महिलेचा जीव वाचवण्यात यश आले.

Sameer Amunekar

फोंडा: केरये, खांडेपार येथे एका महिलेने नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, फोंडा पोलिसांनी प्रसंगावधान राखून आणि तातडीने केलेल्या कारवाईमुळे महिलेचा जीव वाचवण्यात यश आले. ही घटना आज, सोमवार (३० जून २०२५) दुपारच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आज दुपारी ती खांडेपार येथील नदीकिनारी पोहोचली आणि नदीत उडी मारण्याच्या तयारीत होती. हा प्रकार काही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ फोंडा पोलिसांना याबाबत माहिती दिली.

माहिती मिळताच, फोंडा पोलीस दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच क्षणाचाही विलंब न लावता महिलेला समजावले आणि पुढील मदतीसाठी ताब्यात घेतले.पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि शिताफीने केलेल्या कारवाईमुळे एका महिलेचा जीव वाचला आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nagnath Mahadev Temple Theft: पर्रा येथील नागनाथ महादेव मंदिरात तिसऱ्यांदा चोरी; 30 हजारांची रोकड लंपास, मूर्तीचीही विटंबना

Goa Land Scam: गोव्यातील बनावट पॉवर ऑफ ॲटर्नीचा खेळ खल्लास! SIT च्या धाकाने भूमाफिया पळाले; मुख्यमंत्री सावंतांचा दावा

Fatima Sana Shaikh In Goa: 20 मिनिटांचा संघर्ष अन् 'ती' धाडसी उडी! 'दंगल' गर्लचा गोव्यात थरार, फातिमा सना शेखचा Video Viral

Surya Gochar 2026: शनिच्या नक्षत्रात सूर्याचे आगमन; 18 मार्चपासून 'या' 3 राशींचे नशिब सोन्यासारखे चमकणार

Virat Kohli Viral Post: विराट कोहलीचा दोन वर्षांनंतर मोठा निर्णय; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं खळबळ!

SCROLL FOR NEXT