Police reshuffle in Goa  Dainik Gomantak
Video

Goa Police Transfer: राज्यात एकाच वेळी सुमारे 50 पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश

Police reshuffle in Goa: दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांची अमली पदार्थविरोधी कक्षाच्या अधीक्षकपदी तर पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांची दक्षिण गोवा अधीक्षकपदी बदली केली आहे.

Sameer Panditrao

पणजी: पोलिस खात्यातील दोन अधीक्षकांसह ५० पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आला. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांची अमली पदार्थविरोधी कक्षाच्या अधीक्षकपदी तर पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांची दक्षिण गोवा अधीक्षकपदी बदली केली आहे. खात्यात एकाच जागी दोन वर्षांहून अधिक काळ असलेल्या पोलिसांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. एकाचवेळी ५० निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश काढण्याची पोलिस खात्यातील ही पहिलीच वेळ आहे. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकपदी असलेल्या सुनीता सावंत यांची जानेवारीमध्ये मुख्यालयात तात्पुरती बदली केली होती आणि अतिरिक्त ताबा अमली पदार्थविरोधी कक्षाचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग यांच्याकडे दिला होता.

पोलिस खात्याच्या विविध विभागांत तसेच स्थानकांत एकाच जागी तीन वर्षांहून अधिक काळ असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यालय पोलिस अधीक्षकांनी त्याची प्रक्रिया सुरू केली होती. आतापर्यंत सुमारे एक हजाराच्या आसपास पोलिसांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यातील काहीजण बदली होऊनही बदलीच्या ठिकाणी न गेल्याने त्वरित आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलिस स्थानक व विभाग निरीक्षकांना दिले होते. बदलीच्या ठिकाणी न गेल्यास वेतन काढले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिल्यावर बदली झालेल्या पोलिसांनी नियोजित ठिकाणी वर्णी लावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीवेळी काही पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश काढला होता. काही प्रमुख पोलिस स्थानकातील निरीक्षकांना त्या ठिकाणी वर्षच झाल्याने त्यांच्या बदल्या केलेल्या नाहीत. ज्यांना एकाच ठिकाणी दोन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे पूर्ण झाली आहेत, तसेच ज्यांच्या कामाबाबत समाधान नाही, त्यांच्या बदल्या केल्या आहेत. ५० पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात ७ वाहतूक पोलिस निरीक्षक आहेत. क्राईम ब्रँचमधील दोघा निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT