गोवा: गोव्यातील प्रसिद्ध मासेमारी पेले याने बुधवारी (२६ फेब्रुवारी) समुद्राच्या किनाऱ्यावर अडकलेल्या कासवाच्या पिल्लांना जीवनदान दिले आहे. समुद्राच्या किनारी अडकलेल्या या छोट्याश्या पिल्लांना पुन्हा समुद्रात सोडताना त्याने सर्वांनां पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
गोव्यातील किनाऱ्यावर काही स्थानिक पर्यटकांकडून देखील पेलेला कासवांना वाचवण्यात मदत करण्यात आली होती. सध्या पेलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत.
या कामगिरीबद्दल बोलताना पेले याने पर्यावरणाच्या महत्वावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पेले म्हणतोय की गोवा हे राज्य पर्यावरणाला जपणारं आहे त्यामुळे प्रत्येकाने वेळोवेळी पर्यावरणाला मदत केलीच पाहिजे.
सोबतच त्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दक्षिण गोव्यात कोळसा प्रकल्प राबवू नये अशी विनंती केली आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे गोव्यातील कित्येक परिवार हे मासेमारीच्या व्यवसायावर अवलंबून आहेत, राज्यात कोळशाचा प्रकल्प सुरू झाला तर पर्यावरणाचे नुकसान होईल. समुद्रात मासे जगू शकणार नाहीत आणि परिणामी मासेमारीच्या व्यवसायात घट झाल्याने राज्यातील व्यवसाय ठप्प होऊ शकतो. गोवा हे पर्यावरणाला जपत आले आहे आणि अशाप्रकारे पर्यावरणाचा ह्रास करणं बरोबर नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.