Panaji Smart City Dainik Gomantak
Video

Panaji Smart City: पणजी स्मार्ट सिटीचे 92.25% काम पूर्ण; Watch Video

Panaji Smart City Update: स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पणजीत १ डिसेंबर २०२५ पर्यंत ९२.२५ टक्के प्रकल्प पूर्ण झाले आहेत. पणजी सोडून देशातील इतर शहरात ९६ टक्के प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

Sameer Panditrao

पणजी: स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पणजीत १ डिसेंबर २०२५ पर्यंत ९२.२५ टक्के प्रकल्प पूर्ण झाले आहेत. पणजी सोडून देशातील इतर शहरात ९६ टक्के प्रकल्प पूर्ण झाले आहेत. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी कामकाज खात्याचे राज्यमंत्री तोखन साहू यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. खासदार सयानी घोष यांनी तारांकित प्रश्न विचारला होता, त्यावर साहू यांनी उत्तर दिले आहे.

पणजीसाठी स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत एकूण ५१ प्रकल्प मंजूर झाले, त्यातून ४७ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. सध्या चार प्रकल्पांचे काम सुरू आहे. ५१ प्रकल्पांसाठी १०५१ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पूर्ण झालेल्या ४७ प्रकल्पांसाठी १०४७ कोटी रुपये खर्च झाले आहेत. उरलेल्या चार प्रकल्पांसाठी ३७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

या उत्तरात पुढेही म्हटले आहे की, देशभरात शंभर शहरात स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत ८ हजार ६४ प्रकल्प मंजूर झाले. त्यासाठी १.६४ लाख कोटी रुपये मंजूर झाले. त्यातील १.५५ लाख कोटी रुपयांचे ७ हजार ७४१ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. तर ३२३ प्रकल्पांचे काम सुरू आहे.

त्यास सरकारने ९ हजार ४२५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. स्मार्ट सिटी मिशनची मुदतवाढ ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढविण्यात आली होती. ती सर्व कामे आता डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना सर्व राज्यांना नागरी कामकाज खात्याने दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sacorda: सफर गोव्याची! पावसाळ्यात हिरवीगार शाल पांघरणारे, कदंबकालीन शिवमंदिराची भक्ती करणारे 'साकोर्डा'

Iranian Warship Attack: श्रीलंकेच्या किनाऱ्यावर इराणच्या युद्धनौकेवर पाणबुडी हल्ला, ‘IRIS डेना’ समुद्रात बुडाली; 101 कर्मचारी बेपत्ता, 78 जखमी

Milind Soman Goa Swimming: गोव्यात मिलिंद सोमणचं हटके होळी सेलिब्रेशन! खवळलेल्या समुद्रात 15 किमी स्विमिंग; अचाट स्टॅमिना पाहून नेटकरी थक्क VIDEO

T20 World Cup 2026 Semifinal: "हार मानणं आमच्या रक्तात नाही!" सेमीफायनलपूर्वी हॅरी ब्रूकचा भारताला तगडा इशारा; टीम इंडियाचा विजयी रथ रोखण्यासाठी ठोकला शड्डू

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

SCROLL FOR NEXT