PM Modi Dainik Gomantak
Video

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय सुरक्षा बैठक

PM Modi: या हल्ल्याची बातमी मिळताच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपला सौदी अरेबियाचा दौरा सोडून भारतात परतले. त्यांनी भारतात पोहोचताच देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

Manish Jadhav

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना निशाणा बनवत मंगळवारी (22 एप्रिल) भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. मीनी स्वीत्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हाहाकार उडवून दिला. या हल्ल्यानंतर देशभरात सध्या रोष पाहायला मिळत आहे. पाकिस्तान पुरस्कृत या दहशतवादी हल्याला चोख प्रत्यत्तर देण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

दरम्यान, या हल्ल्याची बातमी मिळताच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही आपला सौदी अरेबियाचा दौरा सोडून भारतात परतले. त्यांनी भारतात पोहोचताच देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी या हल्ल्यासंबंधी पंतप्रधानांना सविस्तररित्या सांगितले. आता मोदी सरकार काय मोठी कारवाई करतेय हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Opinion: पोर्तुगीजांनी 'तिठे' उभारून बाजार भरवला, पण आज करोडो खर्चूनही विक्रेते रस्त्यावर का बसतात?

Opinion: गोव्यात 'भिवपाची गरज ना', असं गुंडांना वाटतंय; सामान्यांच्या मनात मात्र भीती!

गोव्यातील तरुणीवर उत्तरप्रदेशमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार? तरुणीने व्हिडिओतून केले गंभीर आरोप

AI Image trends: 'फोटो ट्रेंड्स'च्या मायाजाळात हरवू नका; वैयक्तिक स्वातंत्र्याचा विचार करा!

Cabinet Decision: स्थानिकांना 1000 सरकारी नोकऱ्या मिळणार, गोव्यात युनिटी मॉलसह 7 मोठे प्रकल्प उभे राहणार; मंत्रिमंडळात CM सावंतांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT