Loliem Polem Filmcity Dainik Gomantak
Video

Goa Filmcity: गोव्यात फिल्म सिटीच्या नावावर जमीन बळकावण्याचा प्रयत्न नको! Video

Loliem Filmcity: दरम्यान, लक्ष्मीकांत शेटगावकर म्हणाले की, गोव्यात जे सिनेनिर्माते चित्रिकरणासाठी येतात ते निसर्ग चित्रिकरणासाठी. आज ज्या फिल्म सिटी आहेत त्या बंद पडू लागल्या आहेत.

Sameer Panditrao

पणजी: गोवा मनोरंजन सोसायटीने २०२२ साली फिल्म सिटीसाठी २५० एकर जागा हवी असल्याची जाहिरात दिली त्याला आम्ही प्रतिसाद देत प्रस्ताव पाठवला. स्थानिक युवकांना रोजगार मिळावा आणि पर्यावरणाला हानी न करणारा प्रकल्प यावा, कोणीही जागा बळकावण्यापेक्षा जमिनीचा चांगला वापर होईल, या उद्देशाने आमच्या कोमुनिदादने सरकारला ही जमीन दिली असल्याचे लोलये-पोळे कोमुनिदादचे प्रमुख विश्‍वजीत वारीक यांनी सांगितले.

‘गोमन्तक टिव्ही’वरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात वारीक बोलत होते. या चर्चेत गोमंतकीय चित्रपट निर्माते लक्ष्मीकांत शेटगावकर यांनीही सहभाग घेतला होता.

दरम्यान, लक्ष्मीकांत शेटगावकर म्हणाले की, गोव्यात जे सिनेनिर्माते चित्रिकरणासाठी येतात ते निसर्ग चित्रिकरणासाठी. आज ज्या फिल्म सिटी आहेत त्या बंद पडू लागल्या आहेत; कारण आता चित्रपटाच्या तंत्रज्ञानात बदल घडले आहेत. फिल्म सिटीमुळे कोणत्याही प्रकारचे स्थानिकांना रोजगार निर्माण होणार नाहीत. त्याऐवजी या भागात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वाढेल. चित्रिकरणासाठी जे मनुष्यबळ लागते ते गोव्यात उपलब्ध नाही. कोमुनिदादची जमीन भाडेतत्त्वावर देणे म्हणजे एकप्रकारे विकणेच होईल. त्यामुळे भविष्यात फिल्म सिटीच्या नावावर ही जमीन बळकावण्याचा प्रयत्नदेखील होऊ शकतो.

सध्या गाव म्हातारे होताहेत!

गावात आज वृद्ध व्यक्ती सोडल्यास इतर कोणी राहत नाही. शिक्षण झाल्यावर युवक एक तर सरकारी नोकरी, परदेशात नोकरीसाठी किंवा बोटीवर जातात. गावात केवळ म्हातारे राहत आहेत. त्यातही जे आजारी असतात ते शहरात जाऊन राहतात. आपल्या गावाचे अस्तित्‍व टिकवून ठेवण्यासाठी, तरुणाईला रोजगार मिळावा या उद्देशाने आम्ही जमीन देऊ इच्छितो; परंतु जर या जमिनीचा दुरुपयोग होत आहे, असे जाणवल्यास कोमुनिदाद कायद्याप्रमाणे ती परत घेण्याचा अधिकारदेखील आम्हाला असल्याचे विश्‍वजीत वारीक यांनी सांगितले.

सद्यस्थितीत उपयोग शून्यच!

गोवा मनोरंजन सोसायटी फिल्म सिटी उभारू इच्छिते; परंतु त्यांना याबाबत कशाचीच माहिती नाही. फिल्म सिटीमुळे काणकोणमधील अधिकाधिक १०० लोकांना रोजगार मिळेल. २ हजार रोजगार मिळेल, असे जे सांगितले जाते ते चुकीचे आहे. उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभारण्यासाठी मागील तीन-चार वर्षांपासून घाटले जात आहे; परंतु तेथेदेखील फिल्म इन्स्टिट्यूटऐवजी इतर सर्व गोष्टी उभारण्याचा प्रयत्न बिल्डरद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे गोव्यात फिल्म सिटी सद्यस्थितीत उपयोगाची नसल्याचे मत लक्ष्मीकांत शेटगावकर यांनी मांडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cancer: महिलांनो सावधान! गर्भनिरोधक गोळ्या वाढवतायेत कॅन्सरचा धोका? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला अन् खबरदारीचे उपाय

AUS vs SA 2nd T20: दक्षिण आफ्रिकेची ऑस्ट्रेलियावर 'विराट' मात! मोडला आपलाच रेकॉर्ड; गोलंदाजांनी बजावली महत्त्वाची भूमिका

Viral Video: पुराच्या पाण्यातून ट्रॅक्टर घेऊन जाण्याचा जीवघेणा स्टंट, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकरी व्यक्त करतायेत संताप

Dewald Brevis Century: क्रिकेटचा नवा तारा, डेवाल्ड ब्रेव्हिसने टी-20 मध्ये शतक ठोकून रचला इतिहास, अनेक विक्रम मोडले

Pakistan Terrorist Attack: पाकिस्तान पुन्हा हादरला! बलुचिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; 9 पाकिस्तानी सैनिक ठार

SCROLL FOR NEXT