Elephant in Goa | Omkar Elephant Dainik Gomantak
Video

Elephant in Goa: न्हयेंन बुट्टा, शेतांन लोळ्टा! 'ओंकार' अजूनय तांबोशाच; Watch Video

Omkar Elephant: ओंकार हत्ती तांबोसे गावावर भलताच भाळलेला दिसत आहे. सध्या ज्या मळ्यात ओंकार ठाण मांडून आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कवाथे, भातशेती, पोफळी आदी उत्पादन आहे.

Sameer Panditrao

मोरजी: ओंकार हत्ती गेले सात दिवस तांबोसे गावात ठाण मांडून आहे, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसात चालवले आहे, मात्र एकही मंत्री, आमदार अजून येथे फिरकलेले नाही, याबाबत शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.

या ठिकाणी वनरक्षक हातात फटाके घेऊन या हत्तीला पिटाळून लावण्याचा प्रयत्न करीत असले तरी ओंकार हत्ती तांबोसे गावावर भलताच भाळलेला दिसत आहे. सध्या ज्या मळ्यात ओंकार ठाण मांडून आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कवाथे, भातशेती, पोफळी आदी उत्पादन आहे. या ठिकाणी त्याला भरपूर खायला मिळते. खातो खातो आणि तीन ते चार तास एकाच जाग्यावर लोळत बसलेला असतो. त्यानंतर बाजूला असलेल्या तेरेखोल नदीत डुंबतो, असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले. स्थानिक पंच दया गवंडी यांनी सांगितले की, ओंकार हत्तीने आतापर्यंत या भागातील शेती, बागायतींची बरीच नासाडी चालवली आहे. भीतीमुळे शेतकरी मळ्यातही जात नाहीत. एखाद्या वेळी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? सरकारला एखाद्याचा बळी हवा की काय, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

ओंकार हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी वन खात्याची टीम शेतात ठाण मांडून आहे. ज्या ठिकाणी हत्ती लपून बसतो त्याच्या काही अंतरावरून हे कर्मचारी फटाके लावून त्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न करतात. परंतु मनुष्य दिसला की ओंकार पळत सुटतो. त्यामुळे वन कर्मचाऱ्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत, असे ग्रामस्थांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: काळजी घ्या! पाऊस पुन्हा गोव्यात, हवामान विभागाचा 'यलो अलर्ट', 6 दिवस जोरदार कोसळणार

SL Bhyrappa Passed Away: प्रसिद्ध कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांचे निधन; वयाच्या 94व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Goa Crime: सरकारी अधिकाऱ्यावर केला जीवघेणा हल्ला, लंडनला गेला पळून; वर्षभराने संशयिताला कलकत्त्यात अटक

Codar: "देवा राखणदारा, IIT Project फाटी घें" कोडार ग्रामस्थांनी देवाला घातले ‘गाऱ्हाणे’; सरपंचाच्या घरासमोर मोर्चा काढण्याचा इशारा

Viral Video: 'तडपाओगे तडपा लो...!’ चिमुकलीनं गायलं लतादीदीचं गाणं, क्यूटनेसनं जिंकली नेटकऱ्यांची मनं; सोशल मीडियवर धूमाकूळ

SCROLL FOR NEXT