Nitin Nabin Dainik Gomantak
Video

Nitin Nabin: बिहारचे नितीन नवीन भाजपचे कार्यकारी अध्यक्ष

Nitin Nabin appointed as BJP’s National Executive President: दीर्घकाळापासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीचे भिजत घोंगडे पडल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाने राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहार सरकारमधील मंत्री नितीन नवीन यांची नियुक्ती केली आहे.

Sameer Amunekar

नवी दिल्ली : दीर्घकाळापासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीचे भिजत घोंगडे पडल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाने राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहार सरकारमधील मंत्री नितीन नवीन यांची नियुक्ती केली आहे.

विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची ते जागा घेतील. भाजप संसदीय मंडळाकडून नितीन नवीन यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी पंकज चौधरी यांची नियुक्ती झाल्याच्या दिवशीच भाजपने आपला राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नेमला आहे, हे विशेष. बिहार विधानसभा निवडणुकीत नितीन यांनी पाटण्याच्या बांकीपूर मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर नितीशकुमार मंत्रिमंडळात त्यांची सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून वर्णी लागली होती. भाजपचे दिवंगत नेते नवीन किशोर सिन्हा यांचे पुत्र असलेल्या नितीन यांच्या कारकिर्दीस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून सुरुवात झाली होती. २०१० साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर बांकीपूर मतदारसंघातून ते सातत्याने प्रतिनिधित्व करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"ती" बनली काळ! झोपलेल्या नवऱ्याला घरात कोंडलं अन् बाहेरुन टाळं लावून अख्खं घरच दिलं पेटवून; बायकोनं केली संसाराची राखरांगोळी

Toxic Movie Postponed: 'रॉकीभाई'च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! बहुचर्चित 'टॉक्सिक' सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर; 'हे' कारण आले समोर

America Iran War: "दररोज 6900 कोटींचा धूर!" इराणशी नडणं डोनाल्ड ट्रम्पला भोवलं; युद्ध लांबल्यास अमेरिकेला बसणार 18 लाख कोटींचा तडाखा

Sarvona Shigmotsav: ‘गावात पेटली होळी, विवाहितांवर आली देवळात झोपण्याची पाळी'! सर्वण गावातील अनोखी परंपरा..

Impact On Oil Supply: कच्च्या तेलासाठी भारत सध्या दुहेरी कात्रीत! चीन, जपानलाही बसणार फटका; दर भडकण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT