Narve Masandevi Jatra Dainik Gomantak
Video

Narve Masandevi Jatra: 100 हून अधिक वर्षांचा इतिहास असणारी, दिवसाच भरणारी नार्वेतील 'मसणदेवीची जत्रा'; Watch Video

Masandevi Jatra: यंदाही वेगवेगळ्या भागातील हजारो भक्तगणांनी श्री मसणदेवीचे दर्शन घेऊन देवीच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. मनोकामना पूर्ण झालेल्या भक्तगणांनी देवीच्या चरणी नवसही फेडले.

Sameer Panditrao

डिचोली: शंभरहून अधिक वर्षांचा इतिहास आणि परंपरा असलेली तळेवाडा-नार्वे येथील प्रसिद्ध मसणदेवीची जत्रा (मंगळवारी) पारंपरिक पद्धतीने मोठ्या भक्तिभावाने उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी ही जत्रा साजरी होते.

या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे, ही जत्रा फक्त दिवसाच साजरी करतात. रात्रीच्यावेळी या परिसरात भुतांचा वावर असतो, अशी भाविकांची भावना आहे. त्यामुळे काळोख पडू लागल्यानंतर मसणदेवीच्या मंदिराकडे कोणी जात नाहीत, की थांबत नाहीत. दुकानांची फेरीही हटवली जाते. मसणदेवीची जत्रा गोव्यासह अन्य राज्यातही प्रसिद्ध आहे.

यंदाही वेगवेगळ्या भागातील हजारो भक्तगणांनी श्री मसणदेवीचे दर्शन घेऊन देवीच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. मनोकामना पूर्ण झालेल्या भक्तगणांनी देवीच्या चरणी नवसही फेडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WI vs PAK: 18 धावांत 6 विकेट्स...! पाकिस्तानच्या फलंदाजांचा वेस्ट इंडिजच्या 'या' पठ्ठ्यानं उडवला फज्जा; डेल स्टेनचा मोडला 13 वर्ष जुना रेकॉर्ड

Rahul Gandhi: 'मृत' मतदारांसोबत राहुल गांधींची 'चाय पे चर्चा'! निवडणूक आयोगावर पुन्हा साधला निशाणा; VIDEO

Aahana Kumra: 'पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली, गोव्यात मला अटक झाली असती'; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला अनुभव

Pune Crime: रंगकाम करताना घरमालकाला लावला चुना; पुण्यात 4 लाखांची चोरी करणाऱ्या प्रमोदला गोव्यात अटक

Horoscope: गुरुवारी 'गजलक्ष्मी योग'चा शुभ संयोग! 'या' 5 राशींच्या लोकांसाठी उद्याचा दिवस खूप खास, होणार मोठा धनलाभ; भगवान विष्णूचीही राहणार कृपा

SCROLL FOR NEXT