Goa Politics Dainik Gomantak
Video

Goa Politics: बाबू आजगावकरांचा मुलगाच डिस्कोत विकतो गांजा! आमदार आर्लेकरांचे प्रतिउत्तर, म्हणाले, मी पुन्हा येईन...

Pravin Arlekar And Babu Ajgaonkar Controversy: पेडणे मतदार संघातील माजी आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.

Sameer Amunekar

मोरजी: पेडणे मतदार संघातील माजी आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्यामुळे भाजपची इज्जत दोन्ही नेत्यांनी वेशीवर टांगली असल्याची चर्चा सध्या राज्यभर सुरू झाली आहे. दोघांनीही एकमेकांवर गांजा विकत असल्‍याचा आरोप केला आहे.

माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी यापूर्वी भाजपचे पेडणेचे विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर हे पुड्या विकत असल्याचा आरोप अधून मधून करत होते. त्याच अनुषंगाने आज कोरगावमध्ये एका नागरिकाचे घर कोसळल्यानंतर त्याला मदतीचा हात देण्यासाठी बाबू आजगावकर हे कोरगावमध्ये आले होते. त्या ठिकाणी त्यांनी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यावर सडकून टीका केली.

बाबू भ्रमिष्ट झालेत!

माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांचाच मुलगा डिस्कोमध्ये गांजा विकतोय, असा आरोप यावेळी प्रवीण आर्लेकर यांनी केला. पेडणे मतदारसंघातील कायदा-सुव्यवस्था कुठेच बिघडलेली नाही. जे ॲसिड प्रकरण घडलेले आहे, त्या संशयिताला २४ तासांच्या आत पेडणे पोलिसांनी पकडलेले आहे. मग कायदा-सुव्यवस्था कुठे बिघडली? असा सवाल करून माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर जे काही बोलतात ते त्यांचे त्यांनाच माहीत, ते भ्रमिष्ट झाले आहेत, असे आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले.

मी पुन्हा येईन: आजगावकर

पेडणे मतदार संघातील कायदा सुव्यवस्था कमजोर केल्याचा दावा करत पोलिसांची ही भीती राहिलेली नाही. ही प्रकरणे अशीच वाढत आहे. मोपा विमानतळावर एका कामगाराचा खून करण्यात आला. कोरगाव येथील एका पंच महिला सदस्याचा विनयभंग करून तिला मारहाण करण्यात आली. असे वेगवेगळे प्रकार घडत आहेत. कायदा सुव्यवस्था या मतदारसंघात राहिलेली नाही. आमदार प्रवीण आर्लेकर यांचा इतिहास बघितला, तर तो गांजा विकणारा माणूस, आमदारच अशा कृत्यांमध्ये सामील झाल्याचा आरोप यावेळी माजी आमदार बाबू आजगावकर यांनी केला. पेडणे मतदारसंघात २०२७ च्या निवडणुकीत मी पुन्हा येईन, असा दावाही बाबू आजगावकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT