Lairai Jatrotsav, Mogra Flowers Dainik Gomantak
Video

Lairai Jatrotsav: लईराई जत्रेत यंदा मोगरीचा तुटवडा? भाव वाढण्याची शक्यता

Mogra Flowers: सध्या मोगरीचे फुले मोठ्या प्रमाणावर बहरली असून डिचोलीसह अस्नोडा बाजारात सध्या मोगरीच्या फुलांचा खच पडत असल्याचे दिसून येत आहे.

Sameer Panditrao

डिचोली: सध्या मोगरीचे फुले मोठ्या प्रमाणावर बहरली असून डिचोलीसह अस्नोडा बाजारात सध्या मोगरीच्या फुलांचा खच पडत असल्याचे दिसून येत आहे. श्री लईराई देवीच्या जत्रेपूर्वीच मोगरी बहरल्याने ऐन लईराई देवीच्या जत्रेवेळी मोगरींच्या फुलांचा तुटवडा निर्माण होताना या फुलांचा भावही वाढण्याची शक्यता आहे. काही फूल विक्रेत्यांकडून तसे संकेत मिळाले आहेत.

शिरगावच्या लईराई देवीच्या जत्रेच्या आधी साधारण आठ दिवस मोगरी फुलते. त्यासाठी प्रत्येकजण मोगरी फुलावी म्हणून मोगरीची पाने कुटतात. यंदा मात्र पडलेल्या अवकाळी पावसामुळे मोगरीची फुले पंधरा दिवस आधीच पूर्ण बहरात आली आहेत. पुढील आठ दिवसात फुलांचा भार निवळणार असून जत्रेवेळी मोगरीच्या फुलांची मारामारी होणार असा अंदाज सीमा गावकर आणि रविना गावकर या फूल विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे, तर श्री लईराई देवीची लीला अगाध आहे. तेव्हा जत्रेवेळी मोगरीची फुले कमी होणार नाहीत, असा विश्वास शिरगावमधील फूल विक्रेत्यांनी व्यक्त केला असून फुलांना तेजी येणार आहे, असा दावा केला आहे.

मोगरीचे कळे देवीला प्रिय

शिरगावची श्री लईराई देवी म्हटली, की सुवासिक मोगरीच्या कळ्यांची आठवण येते. मोगरीचे कळे श्री लईराई देवीला प्रिय अशी प्रत्येक भक्तांची भावना आहे. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी जाणारे प्रत्येक भाविक मोगरीचे कळे देवीच्या चरणी अर्पण करतात. काही भक्तगण नवस बोलल्यानुसार ठराविक कळ्यांच्या माळा देवीला अर्पण करतात. जत्रेदिवशी धोंड भक्तगणही मोगरीच्या माळा गळ्यात घालतात. जत्रा ते कौलोत्सवापर्यंत शिरगावात मोगरीच्या कळ्यांना प्रचंड मागणी असते. दरवर्षी जत्रा काळात गोव्यासह शेजारच्या राज्यांतून मोगरीच्या फुलांची आवक होत असते. जत्रा काळात शिरगावात मोगरीच्या फुलांचा दरवळ पसरत असतो. मोगरीच्या फुलांना असलेली मागणी पाहता, जत्रा काळात शिरगावात मोगरी फुलांच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तानने जाहीर केला संघ, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT