Video

बागा-हडफडे हॉटेलजवळ भीषण आग! दोन मोठे डिझेल जनरेटर जळून खाक, अग्निशमन दलाने अनर्थ टाळला

Baga Arpora fire: पिळर्ण अग्निशमन केंद्रातून मदतीसाठी बोलावणे आल्यानंतर, म्हापसा अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले

Akshata Chhatre

बागा-हडफडे येथील बुलेट शोरूमजवळ, कर्मा मॉन्टेरो हॉटेलजवळ आज, रविवारी सकाळी ११ वाजून ०४ मिनिटांनी दोन मोठ्या डिझेल जनरेटरला भीषण आग लागल्याची घटना घडली. ओवरलोडिंगमुळे शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पिळर्ण अग्निशमन केंद्रातून मदतीसाठी बोलावणे आल्यानंतर, म्हापसा अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. फायर फायटर सुरज शेटगावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने वेगाने कार्यवाही केली. जवानांनी आग आटोक्यात आणून, ती शेजारच्या इमारतींपर्यंत पसरण्यापासून रोखले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही जनरेटरचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचा नेमका अंदाज घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: जुगाड की जीवाशी खेळ? स्कूटीवर बर्फाची वाहतूक करणाऱ्या पठ्ठ्याचा थरार व्हायरल; स्टंटबाजी पाहून नेटकरी संतापले

Goa Municipal Administrator: मडगाव, मुरगाव आणि म्हापसा नगरपालिकेवर प्रशासकांची नियुक्ती; राज्य सरकारचा मोठा निर्णय, आदेश लागू

Goa Assembly Elections 2027: आगामी विधानसभेसाठी भाजपचा जनसंपर्कावर विशेष भर; आदिवासी आरक्षणाचा विषय चर्चेचा केंद्रबिदू

Goa Mining Auction: 'मेसर्स रॉयलाईन'कडून 12.68 लाखच मिळणार! खाण माल कमी असल्‍याचा कंपनीचा दावा मंत्रिमंडळाला मान्‍य

Goa Education Department: गणवेश, रेनकोटसाठीचे 1,100 रुपये! 15 जुलैपर्यंत थेट खात्यांत; परिपत्रक जारी, 8 हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ

SCROLL FOR NEXT