Margao Rent a Bike Dainik Gomantak
Video

Margao Rent a Bike: मडगावात टॅक्सी चालकांचा राडा; बेकायदेशीर 'रेंट-अ-बाईक' सेवा देणाऱ्या तीन दुचाकी पकडल्या

Margao Rent a Bike: मडगाव शहरात टॅक्सी चालकांनी खासगी गाड्यांच्या बेकायदेशीर व्यावसायिक वापरांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Manish Jadhav

मडगाव शहरात टॅक्सी चालकांनी खासगी गाड्यांच्या बेकायदेशीर व्यावसायिक वापरांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मडगाव परिसरात खासगी नोंदणी असलेल्या तीन दुचाकी भाड्याने (Private Rental Bikes) देणाऱ्या रॅकेटचा टॅक्सी चालकांनी पर्दाफाश केला. हे चालक पर्यटकांना रीतसर परवाना नसतानाही आपल्या खासगी दुचाकी भाड्याने देऊन टॅक्सी व्यवसायाला आर्थिक फटका लावत असल्याचा आरोप टॅक्सी युनियनने केला आहे. या कारवाईदरम्यान टॅक्सी चालकांनी या तीनही दुचाकी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. "काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि रीतसर रेंट-अ-बाईक व्यावसायिकांचे यामुळे मोठे नुकसान होत आहे," अशी भावना यावेळी चालकांनी व्यक्त केली. प्रशासनाने अशा अनधिकृत भाडेतत्त्वावरील गाड्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मडगाव टॅक्सी चालकांनी दिला आहे. या घटनेमुळे मडगावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT