Lotulim shipyard accident Dainik Gomantak
Video

Lotulim Shipyard: ..आनीक 2 कामगारांक उपचारावेळार मरण, Video

Vijay Marine shipyard tragedy: रासई-लोटली येथील विजय मरीन शिपयार्डमध्ये झालेल्या दुर्घटनेत आज आणखी दोन कामगारांचा ‘गोमेकॉ’त उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Sameer Panditrao

मडगाव: रासई-लोटली येथील विजय मरीन शिपयार्डमध्ये झालेल्या दुर्घटनेत आज आणखी दोन कामगारांचा ‘गोमेकॉ’त उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे मृतांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. अभिषेक कुमार (२५) आणि मनीष चौहान (२०, दोघेही उत्तर प्रदेश) अशी मृतांची नावे असून त्यांच्यावर गेल्या आठ दिवसांपासून उपचार सुरू होते. महम्मद बाबुल आणि सुरेन्द्र कुमार हे दोघेही अद्याप गोमेकॉत उपचार घेत असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मायणा-कुडतरी पोलिसांनी दिली.

गेल्या शुक्रवारी (ता. १७) या शिपयार्डमधील सेरही मरीन वेसल बोटीवर वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक आगीचा भडका उडाला होता. त्यात सात कामगार गंभीररित्या भाजले गेले होते. यापैकी सेर अली महंमद अली आणि विनोद दिवान यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर संतोष कुमार याचा गोमेकॉत मृत्यू झाला होता. अभिषेक कुमार, मनीष चौहान, महम्मद बाबुल आणि सुरेन्द्र कुमार यांना तेव्हा गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. त्यापैकी आज अभिषेक आणि मनीष या दोघांनी प्राण गमावले. या दुर्घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, सध्या संबंधित शिपयार्ड सील करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya: भगवान शंकरांचा कृपाशिर्वाद! आठवड्याची होणार धमाकेदार सुरुवात; 'या' राशींना येणार सकारात्मक बातम्या

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणुकीची तारीख अखेर जाहीर! प्रचाराची रणधुमाळी वाढण्याची चिन्हे; 4 मे रोजी होणार मतमोजणी

Horoscope: 'या' राशींना होणार धनप्राप्ती! ग्रह देताहेत शुभसंकेत; कुणाला होणार फायदा? वाचा राशिभविष्य

LPG Gas Cylnder: गोव्यात भीतीमुळे गॅसचे झपाट्याने 'बुकिंग'! एका दिवसात तब्बल 'इतक्या' सिलिंडरचे वितरण; किती साठा आहे शिल्लक? वाचा..

Dhurandhar 2: "यासाठी धुरंधरमधला रोल सोडला"! प्रसिद्ध अभिनेत्याने केला खुलासा; बॉलिवूडमध्ये रंगली जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT