Leopard In Bicholim  Dainik Gomantak
Video

Leopard Sighting: डिचोलीत आणखी एक बिबट्या? वाढत्या संचाराने नागरिक भयभीत; धबधबा परिसर ठरतोय अधिवास?

Leopard In Goa: वर्षभरात दोन बिबटे पकडलेल्या डिचोली शहराजवळील धबधबा परिसरात आणखी एक बिबटा असल्याची माहिती समोर आली आहे.

Sameer Panditrao

Bicholim Leopard

डिचोली: वर्षभरात दोन बिबटे पकडलेल्या डिचोली शहराजवळील धबधबा परिसरात आणखी एक बिबटा असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून धबधबा परिसरात भरलोकवस्तीजवळ या बिबट्याची दहशत वाढल्याने लोक पुन्हा भयभीत झाले आहेत. दरम्यान, या बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने पिंजरा लावला आहे.

दहा दिवसांपूर्वी (ता. १९) धबधबा परिसरात भरलोकवस्तीजवळ एका बिबट्याला पकडण्यात वन खात्याला यश आले होते. धबधबा परिसरात वर्षभरात पकडलेला हा दुसरा बिबटा होता. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात धबधबा येथे एक बिबटा पकडला होता. दहशत घातलेल्या बिबट्यांना पकडल्याने स्थानिकांनी सुटकेचा श्वास सोडला असतानाच, आता त्याच परिसरात आणखी एका बिबट्याचा संचार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाल्‍याने लोकांची घाबरगुंडी उडाली आहे.

लोकवस्तीजवळ या बिबट्याचे दर्शन झाले आहे. त्‍यामुळे सध्या लोक भीतीत वावरत आहेत. रात्री एकटे बाहेर कोणी पडत नाही, असे राजू मांद्रेकर, सुरेश नारूलकर यांनी सांगितले.

धबधबा परिसरात बिबट्यांचा अधिवास?

वर्षभरात दोन बिबटे पकडल्‍यानंतर पुन्हा एकदा बिबट्याने दहशत माजविल्‍यामुळे धबधबा परिसरात बिबट्यांचा अधिवास असल्याचा अंदाज लोक व्यक्त करत आहेत. भक्ष्य शोधण्यासाठी हे बिबटे लोकवस्तीत घुसत आहेत, असेही बोलले जात आहे. आता हा तिसरा बिबट्या वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात कधी एकदाचा अडकतोय, याची प्रतीक्षा धबधबावासीयांना लागून राहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'रामा'च्या न्यायासाठी पणजीत काढलेला मोर्चा अवैध असल्याचा आरोप; युरी आलेमाव, विजय सरदेसाई यांच्यासह 450 जणांविरोधात गुन्हा

Sanguem: ..अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली! सांगेतील माय-लेकीला मिळाला हक्काचा निवारा; मंत्री फळदेसाईंचा पुढाकार

Goa Coconut Price: नारळ अजून महागच! टोमॅटो, कांदाही भडकला; वाचा ताजे दर

Goa News Live: ओपा प्रकल्पातील पंप अखेर सुरु, राजधानीला मिळणार पाणी

Zilla Panchayat Election: गोवा फॉरवर्ड, ‘आप’कडून जोर, काँग्रेस स्‍वस्‍थच! जिल्‍हा पंचायत निवडणूक; सरदेसाईंकडून उमेदवार चाचपणी

SCROLL FOR NEXT