Bicholim Health Center Danik Gomantak
Video

Bicholim Primary Health Centre: सुविधांच्या अभावामुळे 'या' रुग्णालयात रुग्णांची गैरसोय!

Bicholim News: डिचोलीतील आरोग्य केंद्रात अनेक सुविधांचा अभाव असून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची अक्षरशः परवड होत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Health Centre Of Bicholim:

डिचोलीतील सामाजिक आरोग्य केंद्रात अनेक सुविधांचा अभाव असून या केंद्रात डॉक्टर्स, परिचारिकांसह आवश्यक सुविधांची कमतरता असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. या केंद्राला सामाजिक आरोग्य केंद्राचा दर्जा प्राप्त झाला असला आणि आरोग्य केंद्राची इमारत चकाचक वाटत असली तरी आत मात्र विविध समस्या आहेत. सामाजिक आरोग्य केंद्राचा दर्जा मिळूनही केंद्रात आवश्यक त्या सुविधा नाहीत. या आरोग्य केंद्राची पाहणी करून केंद्राचे आरोग्य सुधारावे, अशी मागणी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून होत आहे. गेल्या जवळपास सात-आठ महिन्यांपासून या केंद्रात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नाही. या आरोग्य केंद्रात तज्ञ डॉक्टरांचीही कमतरता आहे. परिचारिकांची संख्याही कमी आहे. त्यामुळे बाह्य रुग्ण विभागासह रुग्ण वॉर्डात सेवा करताना परिचारिकांना कसरत करावी लागत आहे. परिचारिकांची कमतरता असल्याने मलमपट्टी किंवा इंजेक्शन घेण्यासाठी तासन्‌तास ताटकळत राहावे लागते, असे प्रशांत लामगावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT