Drowning Dainik Gomantak
Video

Goa News: वाळवंटी नदीत बुडून कर्नाटकच्या 19 वर्षीय युवकाचा मृत्यू

Drowning Case: आंघोळीसाठी उतरले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्‍याने अमित बुडाला.

Pramod Yadav

पर्ये: सत्तरी तालुक्यातील केरी व मोर्ले पंचायतीच्या हद्दीतून वाहणाऱ्या पेळावदा येथील ‘उभो गुणो’ या वाळवंटी नदीच्या डोहात बुडून अमित धानेश्‍‍वर पंचांगे (१९) या युवकाचा मृत्यू झाला. तर, त्‍याच्‍या मित्राला वाचवण्‍यास यश मिळाले.

मिळालेल्‍या माहितीनुसार, गुरुवारी (२७ मार्च) दुपारी मेरशी-पणजी येथील तीन मित्रांचा गट ‘उभो गुणो’ येथे सहलीसाठी आला होता. आंघोळीसाठी उतरले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्‍याने अमित बुडाला. त्याला वाचवण्यासाठी मित्र गेला, मात्र तोही बुडू लागला.

घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी तत्काळ नदीत उडी मारून दोघांनाही पाण्‍याबाहेर काढले. पण अमितची प्रकृती गंभीर बनल्‍याने त्‍याला तातडीने साखळी सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्‍यात आले. परंतु तेथील डॉक्‍टरांनी त्‍याला मृत घोषित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT