Leopard in Sattari Dainik Gomantak
Video

Sattari News: मालपण-सत्तरी येथे बिबट्याचा संचार; स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

Leopard In Goa: सत्तरी तालुक्यात वन्य प्राणी शेती, बागायतींचे नुकसान करीत असतानाच दुसरीकडे आता बिबट्यासारखे वन्यप्राणी गावातील पाळीव प्राण्यांना भक्ष करीत आहेत. सोमवारी पहाटे मलपण येथील मनोहर जोशी यांच्या अंगणात असलेल्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रकार घडला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Sattari Leopard Attack

वाळपई: सत्तरी तालुक्यात वन्य प्राणी शेती, बागायतींचे नुकसान करीत असतानाच दुसरीकडे आता बिबट्यासारखे वन्यप्राणी गावातील पाळीव प्राण्यांना भक्ष करीत आहेत. सोमवारी पहाटे मलपण येथील मनोहर जोशी यांच्या अंगणात असलेल्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रकार घडला. कुत्रा पिंजऱ्यात असल्याने वाचला. मागील ऑक्टोंबर महिन्यात जोशी यांचा अन्य एका कुत्रा बिबट्याने ठार मारला होते. कुत्र्याला अंगणातून ओढत नेत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात टिपले होते. सोमवारी पहाटे पुन्हा अंगणात बिबटा फिरताना दिसून आला. जोशी यांच्या अंगणात कॅमेरे कार्यान्वित आहेत.

याबाबत मनोहर जोशी यांनी सांगितले की, एकीकडे बागायतदारांना रानटी प्राण्यांच्या आक्रमणाला सामोरे जावे लागत आहे. त्यात खेती, माकड, गवेरेडे, मोर, शेकरे असे वन्य प्राणी बागायती पिकांची प्रचंड प्रमाणात नासाडी करीत आहे. आता बिबटेसारखे वन्यप्राणी गावात येऊन पाळीव प्राण्यांना भक्ष्य बनवित आहे. त्यामुळे बागायतदार दोन्ही बाजूंनी संकटातून जात आहे. बिबट्यामुळे लोकांना बाहेर पडणे धोक्याचे बनले आहे. जंगलातील बिबट्यांचे अन्न संपल्याने गावाकडे बिबट्यांनी मोर्चा वळविला आहे. यात मनुष्यहानी देखील होण्याची संभावना आहे. बिबट्या गावात येणार नाही यासाठी वन खात्याने कारवाई करण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Margao Vande Bharat Express चे डबे वाढणार कधी? प्रवाशांची 20 डब्यांची मागणी; सावंतवाडी येथे थांबा अपेक्षित

"ती" बनली काळ! झोपलेल्या नवऱ्याला घरात कोंडलं अन् बाहेरुन टाळं लावून अख्खं घरच दिलं पेटवून; बायकोनं केली संसाराची राखरांगोळी

Toxic Movie Postponed: 'रॉकीभाई'च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! बहुचर्चित 'टॉक्सिक' सिनेमाचे प्रदर्शन लांबणीवर; 'हे' कारण आले समोर

America Iran War: "दररोज 6900 कोटींचा धूर!" इराणशी नडणं डोनाल्ड ट्रम्पला भोवलं; युद्ध लांबल्यास अमेरिकेला बसणार 18 लाख कोटींचा तडाखा

Sarvona Shigmotsav: ‘गावात पेटली होळी, विवाहितांवर आली देवळात झोपण्याची पाळी'! सर्वण गावातील अनोखी परंपरा..

SCROLL FOR NEXT