Mayem Illegal Hill Cutting Dainik Gomantak
Video

Mayem: मयेत सरकारी जमिनीत बेकायदा डोंगर कापणी, नगर नियोजन खात्याकडे तक्रार दाखल

Mayem Illegal Hill Cutting: मये पंचायत क्षेत्रातील देवूस-भटवाडी परिसरात सरकारी मालमत्तेत बेकायदेशीरपणे डोंगर कापणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Sameer Panditrao

Mayem Hill Cutting

डिचोली: मये पंचायत क्षेत्रातील देवूस-भटवाडी परिसरात सरकारी मालमत्तेत बेकायदेशीरपणे डोंगर कापणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. एक स्थानिक नागरिक आत्माराम किनळकर यांनी तशी तक्रारही केली आहे.

याप्रकरणी नगरनियोजन खात्यासह, उपजिल्हाधिकारी आणि अन्य संबंधित यंत्रणांना निवेदन देऊनही कोणीच या प्रकाराकडे लक्ष देत नाही, असे किनळकर यांचे म्हणणे आहे. देवूस-भटवाडी येथील सर्व्हे नं. १५७/३ मध्ये गेल्या काही दिवसांपासून जेसीबी यंत्राच्या साहाय्याने डोंगर कापणी सुरू आहे. या प्रकाराकडे स्थानिक पंचायत किंवा अन्य यंत्रणांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे, असा दावा आत्माराम किनळकर यांनी पत्रकारांना माहिती देताना केला.

संबंधित यंत्रणेने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन हा बेकायदा प्रकार त्वरित रोखावा, अशी मागणी आत्माराम किनळकर यांनी केली आहे. यापूर्वीही २०१८ साली याच जागेत बेकायदेशीरपणे डोंगर कापणी करण्यात आली होती, अशी माहितीही किनळकर यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait Of Hormuz: '20 लाख डॉलर डॉलर्स द्या, सुरक्षित मार्ग मिळवा...' इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीचा नकाशा प्रसिद्ध; व्यापारी जहाजांच्या मानेवर स्फोटकांची तलवार

VIDEO: विराटचं नाव आलं अन् बाबरचं डोकं फिरलं! किंग कोहलीच्या 'फिनिशिंग' स्टाईलवरुन पत्रकाराची गुगली; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

काय तो निर्णय अन् काय तो राग! भर मैदानात पडला रक्ताचा सडा, रनआऊटसाठी अंपायरची चाकू भोसकून हत्या; क्रिकेट टूर्नामेंटमध्ये थरार

8th Pay Commission: मोदी सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट, मुलांच्या शिक्षणासाठी मिळणार बक्कळ पैसा; CEA चे नवीन नियम जाहीर

Iran US Ceasefire: पाकड्यांची 'इंटरनॅशनल' फजिती! कॉपी-पेस्ट मेसेजवरुन शाहबाज शरीफ ट्रोल; इराण-अमेरिका शस्त्रसंधीचं क्रेडिट घेण्याची धडपड

SCROLL FOR NEXT