illegal tree cutting in Maina Curtorim  Dainik Gomantak
Video

Maina Curtorim: हाऊसिंग प्रोजेक्ट्साठी कापली 50 झाडे! मायणा-कुडतरीत वृक्षतोड; संतप्त नागरिकांचा वन खात्यावर मोर्चा

Maina Curtorim Dispute: वन खात्‍याकडे विचारणा केली असता, या बिल्‍डरच्‍या विरोधात आम्‍ही गुन्‍हा नोंद केला आहे, अशी माहिती त्‍यांनी दिली.

Sameer Panditrao

मडगाव: मायणा-कुडतरी येथे येणाऱ्या ‘त्‍या’ वादग्रस्‍त हाऊसिंग बांधकाम प्रकल्‍पाच्‍या जागेत असलेल्‍या सुमारे ५० झाडांची बेकायदेशीररित्‍या कत्तल ही जागा विकसित करणाऱ्या प्रवर्तकाने केली आहे, अशी तक्रार कुडतरीतील नागरिकांनी आज वन खात्‍याकडे केली. या बिल्‍डरवर वन खात्‍याने काय कारवाई केली आहे याचा जाब विचारण्‍यासाठी नागरिकांनी वन खात्‍याच्‍या कार्यालयाला भेट दिली.

कुडतरीचे माजी जिल्‍हा पंचायत सदस्‍य मोरेन रिबेलो यांचा त्‍यात समावेश होता. या बिल्‍डरला वन खात्‍याकडून फक्‍त १२ झाडे कापण्‍याची परवानगी मिळाली होती; पण प्रत्‍यक्षात ५० च्‍या वर झाडांची कत्तल केली आहे. या झाडांमध्‍ये आंबा, फणस आणि काही सागवानी झाडांचाही समावेश हाेता, असे त्‍यांनी सांगितले.

वन खात्‍याकडे विचारणा केली असता, या बिल्‍डरच्‍या विरोधात आम्‍ही गुन्‍हा नोंद केला आहे, अशी माहिती त्‍यांनी दिली. वास्‍तविक बेकायदेशीररीत्‍या केलेल्‍या झाडांच्‍या कत्तलीची वन खात्‍याने गंभीर दखल घेऊन यासाठी वापरलेली यंत्रसामग्री जप्‍त करण्‍याची गरज होती, असे मत रिबेलाे यांनी व्‍यक्‍त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Smart Meter Protest: जोपर्यंत अधिसूचना निघत नाही, तोपर्यंत...! स्मार्ट मीटरविरोधात पाटकरांची जनतेला थेट आंदोलनाची हाक; विद्युत भवनावर महामोर्चा

खरी कुजबुज: कोकणी शिक्षणाचा बट्ट्याबोळ

Pakistan Statement Controversy: "पाकिस्तान आम्हाला प्रिय'', अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यावर रिपब्लिकन सिनेटर्सचा हल्लाबोल, म्हणाले, 'आधी तुमचे खरे मित्र ओळखा!'

Usgao Leopard Incident: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! उसगावात धावत्या बाईकसमोर आला बिबट्या; अपघातात सत्तरीचे दोन तरुण जखमी

Goa Fraud Case: एक सही, मोठं आमिष अन् 1.25 कोटींचा गंडा! सव्वा दोन वर्षांनंतर 'लेडी डॉन' गजाआड; कोर्टानं सुनावली 7 दिवसांची कोठडी

SCROLL FOR NEXT