Tripurari Pournima Goa Dainik Gomantak
Video

Sanquelim Tripurari Pournima: वाळवंटीत रंगला दैदिप्यमान नौकानयन सोहळा

Sankhali Tripurari Pournima: दीपदान, नौकाविहार स्पर्धा आदी पारंपरिक कार्यक्रम आणि हजारो नागरिकांच्या साक्षीत विठ्ठलापूर - साखळी येथील प्रसिद्ध त्रिपुरारी उत्सवाला शुक्रवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Sanquelim Tripurari Pournima

डिचोली: दीपदान, नौकाविहार स्पर्धा आदी पारंपरिक कार्यक्रम आणि हजारो नागरिकांच्या साक्षीत विठ्ठलापूर - साखळी येथील प्रसिद्ध त्रिपुरारी उत्सवाला शुक्रवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त प्रति पंढरपूर म्हणून ओळखण्यात येणाऱ्या विठ्ठलापुरात सायंकाळी ते मध्यरात्रीपर्यंत भलताच उत्साह संचारला होता.

काल (गुरुवारी) रात्री जोरदार पर्जन्यवृष्टी झाली होती. त्यामुळे या महोत्सवावर पावसाचे सावट पसरले होते. मात्र, आज साखळी परिसरात पाऊस पडला नाही. त्यामुळे वाळवंटी नदीकिनारी जमलेल्या हजारो भाविकांचा उत्साह द्विगुणित झाला. पर्यटकांसह वाळवंटी नदीकाठी लोकांची गर्दी लोटल्याचे चित्र दिसून येत होते. राज्यस्तरीय ‘नौकाविहार’ स्पर्धा यामुळे विठ्ठलापूर-साखळी येथील त्रिपुरारी पौर्णिमा महोत्सव गोव्यासह शेजारील राज्यांतही प्रसिद्धीस पावलेला आहे. या उत्सवाला राजमान्यता मिळाल्यापासून राज्य सरकारचे पर्यटन, कला आणि संस्कृती, माहिती आणि प्रसिद्धी खाते तसेच विठ्ठलापूर दीपावली उत्सव समिती आणि श्री पांडुरंग देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. गर्दी उसळल्याने पोलिस आणि वाहतूक पोलिसांवर ताण आला होता.

दीपदान अन् नौकाविहार

सकाळी श्रीकृष्ण पुजन झाल्यानंतर सायंकाळी भगवान श्रीकृष्णाची मिरवणूक काढण्यात आली. नंतर वाळवंटी नदीपात्रात दीपदानाचा कार्यक्रम झाला. सुवासिनी आदी भक्तांनी पेटते दीप नदीपात्रात सोडले. श्री पांडुरंग देवस्थानच्या प्रांगणात शुभम साई प्रस्तुत ऑर्केस्ट्रा कार्यक्रमही रंगला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: 'जीसीए'च्या तुळशीदास शेट्ये, हरीश शिंदेंना अटकपूर्व जामीन! सरकारी ऑडिटरला डांबून ठेवल्याचा, दबाव आणल्याचा आरोप

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

SCROLL FOR NEXT