Goa University Scandal Dainik Gomantak
Video

Goa University: प्रेमाचा मामला, पेपर फोडला; 'त्या' विवाहित प्राध्यापकाचं निलंबन

Goa University News Update: विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विद्यार्थिनीला परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उघड केल्याबद्दल 'त्या' सहाय्यक प्रज्ञापकाला निलंबित केले आहे

Akshata Chhatre

Assistent Professor Suspended Goa University

पणजी: काही दिवसांपूर्वी गोवा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र व उपयोजित विज्ञान विभागात एका सहाय्यक प्राध्यापकाने त्याच्या मैत्रिणीसाठी प्रश्नपत्रिकेची चोरी करत तिला प्रथम क्रमांक मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी सोमवार (दि.१७) रोजी समोर आलेल्या माहितीनुसार गोवा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विद्यार्थिनीला परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उघड केल्याबद्दल 'त्या' सहाय्यक प्रज्ञापकाला निलंबित केले आहे. पुढील निर्णय येईपर्यंत या शिक्षकाला निलंबित केले गेलेय.

या प्राध्यापकाने, जो पूर्वीच विवाहित आहे त्याची प्रेयसी असलेल्या विद्यार्थिनीला मदत करण्याच्या हेतूने हे भयंकर गुन्हेगारी कृत्य केले होते. त्याने आपल्या विभागातील सर्व प्राध्यापकांच्या कपाटांच्या चाव्या मिळविल्या, त्या प्राध्यापकांच्या कपाटाचे केबिन उघडले, संगणक सुरू केले, याशिवाय प्रश्नपत्रिकाही प्राप्त केल्या होत्या. या परीक्षेत या विद्यार्थिनीला चांगले गुण प्राप्त झाले. त्यामुळे या विभागातील सर्व प्राध्यापकांच्या मनात संशय निर्माण झाला. त्याचा पडताळा सर्वांना दुसऱ्या परीक्षेत आला. त्यात ही विद्यार्थिनी नापास झाली. त्यामुळे चौकशी सुरू झाली.

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये आणि इतर सहा जणांनी साहाय्यक प्राध्यापक प्रणव नाईक याच्याविरोधात आगशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून देखील या प्रकरणाचा निषेद व्यक्त करण्यात आलाय आणि गटाने विद्यापीठाच्या बाहेर सोमवारी (दि.१७) कठोर कारवाईची मागणी करत आंदोलन राबवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT