Goa Salt Pan Preserve Dainik Gomantak
Video

Salt Pan Preserve: गोव्याच्या 'मिठागरांना' नवसंजीवनी! राज्य सरकारकडून 95 लाखांची तरतूद, 75 शेतकर्‍यांना मिळणार थेट लाभ

Goa Salt Pan Preserve: गोव्याचा ऐतिहासिक वारसा असलेल्या पारंपारिक मिठागरांचे (Salt Pans) संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे.

Sameer Amunekar

गोव्याचा ऐतिहासिक वारसा असलेल्या पारंपारिक मिठागरांचे (Salt Pans) संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. 'मिठागर संवर्धन, साहाय्य आणि पुनरुज्जीवन' योजनेअंतर्गत सरकारने ९५ लाख रुपयांच्या विशेष निधीला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे लुप्त होत चाललेल्या मिठागर व्यवसायाला आणि त्यावर अवलंबून असलेल्या शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पर्यावरण संचालक सचिन देसाई यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण निधीपैकी ७५ लाख रुपयांचा सिंहाचा वाटा थेट पारंपारिक मिठागर व्यावसायिकांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ७५ मिठागर शेतकर्‍यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे वार्षिक आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे. गेल्या काही वर्षांत मजुरांची कमतरता आणि नैसर्गिक बदलांमुळे मिठाचे उत्पादन घटत चालले होते, मात्र या आर्थिक मदतीमुळे शेतकर्‍यांना ही परंपरा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma: "अजीब लग रहा है इधर..." वानखेडेवर टीम इंडियाचा ड्रेसिंग रूम पाहून 'मुंबईचा राजा' भावूक Watch Video

मौर्य सम्राट चंद्रगुप्ताने आपले सिंहासन सोडले होते आणि भद्रबाहूसोबत श्रवणबेळगोळच्या टेकडीवर गेला; भगवान गोमटेश्वराचा शिलालेख

Surya Gochar 2026: आत्मविश्वास वाढणार, मान-सन्मान मिळणार! सूर्य देवाच्या कृपेनं 'या' राशींचं नशीब चमकणार

कोकणातल्या चाकरमान्यांना 'लालपरी'चा आधार; 'शिमगोत्सवासा'ठी मुंबई–कोकण मार्गावर जादा गाड्या धावणार, येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक

"तो जर भेटायला पर्वरी ओलांडून आला, तर त्याच्याशी लग्नच कर"! 2100 साली कसा दिसणार पर्वरीचा रोड? पहा धमाल Photo

SCROLL FOR NEXT