Pooja Naik Case Dainik Gomantak
Video

Pooja Naik: पूजा नाईकची नार्को चाचणी करावी, त्यातून बरीच नावे समोर येतील - काशिनाथ शेट्ये

Cash For Job: पूजा नाईकने केलेले आरोप हे खोटे, असे पोलिसांनी सांगून त्या प्रकरणाला एकंदरीत क्लीन चिट दिली; परंतु त्यामागे बरेच काही दडलेले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: पूजा नाईकने केलेले आरोप हे खोटे, असे पोलिसांनी सांगून त्या प्रकरणाला एकंदरीत क्लीन चिट दिली; परंतु त्यामागे बरेच काही दडलेले आहे, यावर लोक ठाम आहेत. तसेच सरकार ज्यांना घाबरेल असे अधिकारीच राहिले नाहीत, याकडेदेखील चर्चेत लक्ष वेधून अमित पालेकर यांनी सरकारी कर्मचारी काशिनाथ शेट्ये व अमरसिंग राणे यांचा दाखला दिला.

या दोघांना सरकारदेखील घाबरते, असे त्यांनी स्पष्ट सांगून सरकारचे अधिक झाल्यावर लोक एकत्र येणार व एक लोकचळवळ लवकरच उभी राहणार, अशी अपेक्षा पालेकर व काशिनाथ शेट्ये यांनी व्यक्त केली. ‘गोमन्‍तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात बोलताना ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष तथा वकील अमित पालेकर आणि सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांनी याविषयी सामाजिक भावना आणि लोकांचे प्रश्न उपस्थित केले.

गुन्हे शाखेने काही अधिकारी आणि मंत्र्यांना या प्रकरणात ‘क्लीन चिट’ दिल्याच्या पार्श्वभूमीवर पालेकर यांनी तपास पद्धतीवर आक्षेप घेतला. जेव्हा पूजा नाईक पोलिस अधीक्षक व उपअधीक्षक यांच्यावर आरोप करते तेव्हा सरकारने ही चौकशी करण्यासाठी इतर संस्था निवडायला हवी होती; परंतु सरकारने तसे केले नाही. पोलिसांनीच नार्को चाचणी करण्याची गरज व्यक्त केली होती. त्यानंतर पूजादेखील या चाचणीसाठी तयार झाली तर मग अजून ती का केली जात नाही? असा प्रश्न उपस्थित करत पालेकर यांनी ‘पोलिसांना नार्को चाचणी नको आहे, कारण ते घाबरले आहेत’ असे स्पष्ट मत मांडले.

तपास सुरवातीपासून व्हावा

पूजा नाईक हिने माध्यमांसमोर जे आरोप केले, त्यात माझा संबंध केवळ तिला व्यासपीठ मिळवून देण्यापुरता होता. तिच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवावा हा प्रश्न असला तरी, ८० लोकांना तिने नोकरी दिली तर त्यांचा पोलिसांनी शोध घेणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकरणाचा २०१९ पासून नव्हे तर सुरुवातीपासून तपास व्हावा, अशी अपेक्षा पालेकर यांनी व्यक्त केली.

नार्को चाचणीने सत्य बाहेर येईल

सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांनी पोलिसांनी पूजा नाईकच्या आरोपांना क्लीन चिट दिल्याचे मानण्यास नकार दिला. ते म्हणाले की, मला वाटते चौकशी अजून सुरू आहे. जर कुणी पुरावे दिले तर हे प्रकरण पुन्हा उघडले जाईल. पूजा नाईकची नार्को चाचणी करावी. पूजा नार्को चाचणी करावी आणि त्यातून बरीच नावे देखील समोर येतील. ज्यांना नोकरी दिली ते मिळाले, तर चौकशी पुढे जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT