DGP Alok Kumar Dainik Gomantak
Video

DGP Alok Kumar: 'गोव्यात यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत', DGP आलोक कुमार; Video

Goa Gang War: मुंगुल येथील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. गुन्हेगाराबाबत कडक भूमिका घेतली आहे. आम्ही असल्‍या अनिष्ट गोष्टी खपवून घेणार नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

Sameer Panditrao

मडगाव: कुणालाही कायदा हाती घेऊ दिला जाणार नसून गॅंगवॉरसारखे प्रकार खपवून घेणार नसल्याचे पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी स्पष्ट केले. सोमवारी त्यांनी दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयात भेट देऊन गुन्हेगारीविषयी आढावा बैठक घेतली.

मुंगुल येथील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. गुन्हेगाराबाबत कडक भूमिका घेतली आहे. आम्ही असल्‍या अनिष्ट गोष्टी खपवून घेणार नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. बैठकीत मुंगूल येथील गोळीबाराच्या घटनेबाबतचा सर्व घटनाक्रम व झालेली अटकेबाबत माहिती घेतली. या प्रकरणी आतापर्यंत झालेली कारवाई व यापुढे कोणती कारवाई केली जाणार आहे याची माहिती घेतली.

गँगवॉर प्रकरणात पोलिसांनी कडक भूमिका घेत संशयितांना अटक केलेल्या आहेत. या कारवाईतून गोव्यात यापुढेही असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा संदेश गुन्हेगारांना देण्यात आलेला आहे. राज्यात कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देणार नाही. त्यासाठी कडक पोलिस बंदोबस्त केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यात छोट्या छोट्या गँग सुरू झाल्याचे पत्रकारांनी त्यांना विचारले असता, अशाप्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी दक्षिण गोवा, उत्तर गोवा व गुन्हे शाखा यांच्याकडून कडक कारवाईची पावले उचलण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.

कुंकळ्ळी पोलिसांना मारहाण करण्यात आलेल्या सर्व संशयितांना अटक केलेली असून यापुढे असे प्रकार न होण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असेही पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Govind Gaude: "स्लॅब पडणे आणि छत कोसळणे यात फरक असतो", कला अकादमीच्या वादावरून आमदार गावडेंची 'माध्यमांवर' टीका

World Cup 2025: वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! ‘या’ खेळाडूंकडे मोठी जबाबदारी; अनुभवी अन् युवा खेळाडूंचा मिलाफ

Goa Rain Alert: सावधान! मच्छिमार, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन; हवामान खात्याकडून सूचना जारी

Asia Cup 2025: आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा, सूर्याकडे संघाची कमान; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Goa Live News: दुधसागर नदीच्या पाण्याची पातळी वाढली

SCROLL FOR NEXT