Goa LPG Gas Shortage 
Video

Goa LPG Gas Shortage: मध्यपूर्वेतील युद्धाचा गोव्यातील हॉटेल व्यवसायाला चटका! राज्यात सिलिंडरचा तुटवडा

Goa LPG Gas Shortage: अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील वाढत्या युद्धजन्य तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचे थेट परिणाम गोव्यात जाणवू लागले आहेत.

Manish Jadhav

अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील वाढत्या युद्धजन्य तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचे थेट परिणाम गोव्यात जाणवू लागले आहेत. आखाती देशांतून होणारी गॅस आयात विस्कळीत झाल्याने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्यातील वितरकांनी व्यावसायिक सिलिंडरचे बुकिंग तात्पुरते बंद केले आहे. या निर्णयामुळे गोव्यातील हॉटेल व्यावसायिक आणि समुद्रकिनाऱ्यावरील शॅक्सना मोठा फटका बसला आहे. सिलिंडरचा साठा संपत आल्याने अनेक उपहारगृहे बंद ठेवण्याची वेळ आली असून पर्यटन हंगामात व्यवसाय कोलमडल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. घरगुती पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असून आंतरराष्ट्रीय संकटामुळे गोव्याचे स्वयंपाकघर आणि पर्यटन दोन्ही संकटात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT