Ravi Naik Ponda  Dainik Gomantak
Video

Lavoo Mamledar Death: "बेळगावात अशी गुंडगिरी चालत असेल तर...." लवू मामलेदार यांच्या मृत्यूवर रवींचे महत्वाचे विधान

Ravi Naik on Lavoo Mamledar Death: कर्नाटक सरकारने यावर ठोस कारवाई केलीच पाहिजे कारण मयत व्यक्ती ही गोव्यातील माजी आमदार आहेत

Akshata Chhatre

फोंडा: फोंडा, गोवाचे माजी आमदार लवू मामलेदार यांच्या निधनामुळे गोव्यात सध्या शोककळा पसरली आहे. शनिवारी (दि. १५ फेब्रुवारी) रोजी बेळगाव येथे एका रिक्षा चालकासोबत झालेल्या वादावादीनंतर लवू मामलेदार यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले. गोव्यातील माजी आमदारांना इथेच मरण आले.

रविवारी गोव्यात माजी आमदारांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत,आणि यावेळी बोलताना फोंड्याचे आमदार आणि मंत्री रवी नाईक यांनी मामलेदार यांच्या आकस्मित निधनावर खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, माजी आमदारांची मुलं बेळगाव येथे शिकत असल्याने त्यांची सतत तिथे ये-जा असायची. कर्नाटक सरकारने यावर ठोस कारवाई केलीच पाहिजे कारण मयत व्यक्ती ही गोव्यातील माजी आमदार आहेत. मामलेदार यांना माहिती देखील नव्हतं कि त्यांच्याकडून एका रिक्षेला धडक बसलेली आहे, हे काही त्यांनी जाणून बुजून केलेलं नाही.

गोव्यातील अनेक लोकांची बेळगावमध्ये ये-जा सुरु असते आणि अशी गुंडगिरी सुरु राहिली तर गोव्यातील लोकांसाठी बेळगावमध्ये जाणं कठीण होईल आणि म्हणूनच यावर कर्नाटक सरकारने कारवाई करणं महत्वाचं आहे. शेवटी माजी आमदार लवू मामलेदार यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT