Goa Karnataka border accident Dainik Gomantak
Video

Truck Accident: गोवा-कर्नाटक सीमेवर मालवाहू ट्रक झाडाला धडकला, 10 लाखांचं नुकसान

Goa Karnataka border accident: गोवा-कर्नाटक सीमेजवळील लक्ष्मी हॉटेलजवळ शनिवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. कर्नाटकातील मालवाहू ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यालगत असलेल्या मोठ्या झाडावर जोरदार धडकला.

Sameer Amunekar

गोवा-कर्नाटक सीमेजवळील लक्ष्मी हॉटेलजवळ शनिवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. कर्नाटकातील मालवाहू ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यालगत असलेल्या मोठ्या झाडावर जोरदार धडकला. धडकेची तीव्रता एवढी होती की, वाहनाच्या पुढील केबिनचा पूर्णपणे चुराडा झाला आणि चालकासह दोघे जण आतमध्ये अडकून पडले.

अपघाताची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाचे अधिकारी व जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. हायड्रॉलिक स्टूल्स व लाईटच्या सहाय्याने जवळपास दोन तास चाललेल्या प्रयत्नांनंतर केबिनमध्ये अडकलेल्या दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. बचाव कार्यादरम्यान दोघांचीही प्रकृती स्थिर असून, त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

या अपघातात ट्रकचे सुमारे १० लाखांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, तात्काळ मदत आणि तडाखेबंद बचावकार्यामुळे दोन जीव वाचले. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Marathi Language: पोर्तुगीजांच्या क्रूर राजवटीत गोव्याची नाळ संस्कृतीशी जोडून ठेवणे मराठीमुळेच शक्य झाले, वेलिंगकरांचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; दिवसभर गायब; पहाटे रेतीचे ढीग!

MGNREGA Goa: अधिक वेतन देण्‍यात 'गोवा' देशात तिसरा! मनरेगाची आकडेवारी आली समोर; हरियाणा आघाडीवर

Horoscope: आजचा सोमवार ठरणार 3 राशींसाठी खास! होणार संपत्तीचा वर्षाव

Goa Land Transfer: परप्रांतीय शेतकऱ्यांना जमिनी विकण्‍यासाठी 60 जण तयार, सरकारकडून 4अर्जांना मान्‍यता

SCROLL FOR NEXT