goa girl becomes pilot Dainik Gomantak
Video

गोव्याच्या जॅनामिका परेराची ‘उंच भरारी’; वयाच्या 21व्या वर्षी बनली पायलट

Janamika Perera Pilot: गोव्यातील काकोडा येथील २१ वर्षीय जॅनामिका परेरा हिने पायलट बनून एक प्रेरणादायी यश संपादन केले आहे

Akshata Chhatre

काकोडा: गोव्यातील काकोडा येथील २१ वर्षीय जॅनामिका परेरा हिने पायलट बनून एक प्रेरणादायी यश संपादन केले आहे. लहानपणापासूनच आकाशात भरारी घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या जॅनामिकाने आपले ध्येय साध्य केले असून, तिच्या या यशाने कुटुंबासह गोव्याचं नाव मोठं केलं आहे.

विज्ञान शाखेतून १२ वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, जॅनामिकाने पायलट होण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. पुढील प्रशिक्षणासाठी ती मुंबईला रवाना झाली. तिथे तिने दीड वर्ष कठोर प्रशिक्षण घेतले. या प्रवासात तिच्या कुटुंबाने, विशेषतः आई-वडिलांनी तिला मोठा पाठिंबा दिला. "या संपूर्ण प्रवासात माझ्या आई-वडिलांनी आणि कुटुंबाने मला खूप मदत केली," असे जॅनामिकाने सांगितले.

जॅनामिकाच्या यशाबद्दल तिचे आई-वडील खूप आनंदी आहेत. “आमच्या मुलीने काहीतरी वेगळं करून दाखवलं, याचा आम्हाला अभिमान आहे,” असे म्हणत त्यांनी तिची पाठ थोपटली. सामान्यतः मुलींनी निवड न करणाऱ्या या क्षेत्रात मिळालेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वेर्णा बायपास वृक्षतोड प्रकरण: झाडांच्या पुनर्रोपणासाठी नियमावली तयार करा, कोर्टाचे सरकारला निर्देश

VIDEO: खडकावर बसला दारूच्‍या नशेत, अजस्त्र लाटांनी त्याला घेतले कवेत; मैत्रिणीच्‍या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नडले; बागा किनाऱ्यावरील घटना

Goa Electricity: वीज ग्राहकांना मिळणार दंडाचे 43 कोटी परत, पुढील बिलांतून वळते; वीज विभागाचा मोठा निर्णय

Horoscope: निर्जला एकादशीला शिवयोगाचा दुर्मिळ संयोग; कुंभ, मीनसह अनेक राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी, धनलाभाचे प्रबळ संकेत

Gold And Silver Crash: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; सोने 1800 तर चांदी 7500 रुपयांनी स्वस्त VIDEO

SCROLL FOR NEXT