Usgao Dainik Gomantak
Video

Usgao: तिराळ-उसगाव येथे घराची भिंत कोसळली, सुदैवानं जीवितहानी टळली

Home Wall Collapse at Tiral-Usgaon: मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तिराळ-उसगाव येथील संदीप व प्रदीप नाईक यांच्या घराची भिंत पूर्णपणे कोसळली.

Sameer Amunekar

राज्यात मुसळधार पावसानं पुन्हा एकदा जोर धरला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तिराळ-उसगाव येथील संदीप व प्रदीप नाईक यांच्या घराची भिंत पूर्णपणे कोसळली. जोरदार पावसामुळे भिंतीला भगदाड पडले आणि अखेर ती जमीनदोस्त झाली.

या घरात संदीप आणि प्रदीप नाईक हे दोघे वास्तव्यास आहेत. मात्र, घटना घडली त्या वेळी ते दोघेही घरात नसल्याने मोठा अनर्थ टळला. पावसामुळे आधीच भिंतीला तडे गेले होते आणि सोमवारी पहाटेच्या सुमारास भिंत पूर्णपणे ढासळली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने पाहणी केली. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून, नाईक कुटुंबीयांच्या घराची त्वरित दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: सरकारी नोकरीतील सुमारे २,५०० पदांवर होणार भरती!

Viral Video: गजराज निघाला 'स्वच्छता दूत'! माणसांना लाजवेल हत्तीची 'ही' कृती; व्हिडिओ व्हायरल

Goa Rain: गोवेकरांनो सावधान! राज्यात रेड अलर्ट; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज

Watch Video: जिद्दी कुंबळे! तुटलेला जबडा घेऊन खेळला अन् लाराची विकेट घेतली; भारतीय क्रिकेट इतिहासातील 'तो' ऐतिहासिक क्षण

Teen Steals ₹95 Lakh:बाबांचा मृत्यू, आई दिल्लीत असताना लहान मुलाने घरातून चोरी केले 95 लाख, मित्रासोबत निघाला होता गोव्याला; विमानतळावर घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT