आमदार मायकल लोबो यांनी समुद्रकिनाऱ्यापासून ५० मीटरच्या आत असलेल्या बिअरच्या दुकानांमध्ये काचेच्या बाटल्यांमध्ये दारू विक्रीवर बंदी घालता येईल का, असा प्रश्न विचारला. यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उत्तर दिले की, "किनारी भागांमध्ये काचेच्या बाटल्यांचा वापर पूर्णपणे बंद करता येईल किंवा त्याऐवजी कॅनमध्ये बिअर विक्रीचा पर्याय देता येईल का, याची सरकारकडून तपासणी केली जाईल."
पावसाळी अधिवेशनात राज्यातील पर्यटनस्थळांवरील काच आणि प्लास्टिक कचरा तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवनामुळे पर्यटकांना होणाऱ्या दुखापतींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला.आमदार मायकल लोबो यांनी ही समस्या तीव्रतेने मांडली, तर पर्यटन मंत्री रोहन खंवटे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर उपाययोजनांची ग्वाही दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.