Goa Dairy Dainik Gomantak
Video

Goa Dairy Issue: गोवा डेरीच्या सर्व सादारण बसकेत सादर केल्लें नियाळपत्रक बोगस, Video

Goa Dairy News: संस्थेत मनमानी कारभार चालत आहे. २०२४-२५ वर्षीचा ताळेबंद पाहता आणि अंदाधुंद कारभार पाहता गोवा डेअरीची अवस्था अत्यंत बिकट होत चालली आहे.

Sameer Panditrao

डिचोली: गोवा डेअरीच्या आमसभेत सादर केलेला ताळेबंद ‘बोगस’ असून या ताळेबंदात दाखविण्यात आलेला नफा कृत्रिम आहे. तसेच मार्केटिंग विभागाच्या प्रमुखपदी एस. मास्कारेन्हस यांची केलेली नियुक्तीही बेकायदेशीर असल्याचा आरोप गोवा डेअरीचे सभासद असलेल्या डिचोलीतील नानोडा आणि आमठाणे दूध उत्पादक सहकारी सोसायटीचे अध्यक्ष अनुक्रमे प्रमोद सिद्ध्ये आणि वैभव परब यांनी केला आहे.

या बेकायदेशीर कृत्यांची सखोल चौकशी करुन आवश्यक ती कारवाई करावी. ताळेबंद रद्द करुन सुधारीत ताळेबंद तयार करावा. ऑडिटरवर कारवाई करावी, अशी मागणी दूध उत्पादक संस्थांनी केली आहे. यासंबंधी सहकार निबंधक आणि अन्य संबंधितांना निवेदन देण्यात आल्याची माहितीही प्रमोद सिद्ध्ये यांनी दिली आहे. गोवा डेअरीचा कारभार जाग्यार घालण्यासाठी ही संस्था दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात द्यावी. अशी मागणी प्रमोद सिद्ध्ये आणि वैभव परब यांनी केली आहे. दरम्यान, गोवा डेअरीचे चेअरमन पराग नगर्शेकर आणि लेखापाल रुक्मा बोरकर यांच्या मदतीने ऑडिटर व्यंकटेश शेनॉय यांनी गोवा डेअरीचा २०२४-२५ या वर्षाकरीता ताळेबंद तयार करण्यात आला. मात्र या ताळेबंदात कृत्रिम नफा दाखविण्यात आला.

शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या

गोवा डेअरीच्या कारभारावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने संस्थेत मनमानी कारभार चालत आहे. २०२४-२५ वर्षीचा ताळेबंद पाहता आणि अंदाधुंद कारभार पाहता गोवा डेअरीची अवस्था अत्यंत बिकट होत चालली आहे, असा दावा प्रमोद सिद्ध्ये आणि वैभव परब यांनी केला आहे. गोवा डेअरीला ''अच्छे दिन'' आणायचे असल्यास ही संस्था दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात द्यावी, अशी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT