Parra murder case Dainik Gomantak
Video

Goa Crime: पर्रा हत्याकांडात मजुराच्या निर्घृण हत्येप्रकरणी पिता-पुत्र अटकेत!

Parra Murder Update: आता ओडिशा येथील रहिवासी असलेल्या सत्या नबरंगपुरा (५०) आणि थबीर नबरंगपुरा (३१) या पिता-पुत्रांना पोलिसांननी ताब्यात घेतले

Akshata Chhatre

पर्रा: मंगळवारी (दि.७) रात्री उशिरा पर्रा येथील एका बांधकाम साईटवर मजुराची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम साईटशेजारील एका लहान खोलीत तीन मजूर एकत्र राहत होते. मंगळवारी रात्री याच खोलीत दोघांनी तिसऱ्या मजुरावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात मृत मजुराच्या डोक्यावर, मानेवर आणि पोटावर गंभीर वार करण्यात आले. एवढेच नाही, तर आरोपींनी त्याच्या गुप्तांगाचीही विटंबना केली असल्याचे समोर आले आहे. या भीषण घटनेनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते, मात्र आता ओडिशा येथील रहिवासी असलेल्या सत्या नबरंगपुरा (५०) आणि थबीर नबरंगपुरा (३१) या पिता-पुत्रांना पोलिसांननी ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Kala Academy: कला अकादमीच्या कामाचे पुन्‍हा होणार स्‍ट्रक्‍चरल ऑडिट, 'पीडब्‍ल्‍यूडी'चा मोठा निर्णय

Goa Politics: "विधानसभेत आमचे प्रश्न ऐकले नाहीत तर सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करणार", विजय सरदेसाईंचा सरकारला इशारा

Goa Health Department: राज्यातील आरोग्य व्यवस्था होणार बळकट; डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका भरतीस सरकारची मान्यता

Aggressive Dogs Ban: राज्यात हिंस्र कुत्र्यांच्या जातींवर बंदी; रॉटविलर, पीटबुल बाळगल्यास कारवाई होणार, CM सावंतांची माहिती

Guru Purnima 2025 Wishes: जो अंधारातही वाट दाखवतो… गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरुंना पाठवा 'या' खास शुभेच्छा

SCROLL FOR NEXT