Goa Crime Dainik Gomantak
Video

Goa Crime: गोवा पोलिसांची 'मेगा' कारवाई; 2025 मध्ये 212 पेडलर्सना दाखवला तुरुंगाचा रस्ता

Goa Crime News: गोवा पोलिसांनी वर्षभरात तब्बल 78.48 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले असून, याप्रकरणी एकूण 212 आरोपींना अटक केली आहे.

Manish Jadhav

गोव्यामध्ये ड्रग्जविरोधी मोहिमेत पोलिसांनी 2025 या वर्षात मोठी कामगिरी केली आहे. गोवा पोलिसांनी वर्षभरात तब्बल 78.48 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले असून, याप्रकरणी एकूण 212 आरोपींना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या साठ्यात चरस, कोकेन, एमडीएमए आणि गांजा यांसारख्या घातक अमली पदार्थांचा समावेश आहे. पर्यटनस्थळे आणि किनारपट्टी भागावर विशेष लक्ष केंद्रित करुन ही कारवाई करण्यात आली. अमली पदार्थ मुक्त गोवा मोहिमेअंतर्गत पोलिसांनी राबवलेल्या कठोर अंमलबजावणीमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत स्थानिक आरोपींसोबतच अनेक विदेशी नागरिकांचाही समावेश असून, अमली पदार्थांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन सक्रिय झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'आरजी'मधील घडामोडी गोव्यातील परंपरेला धरूनच

पंधरा वर्षांनंतर राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण!

Goa Air India: गोव्याकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या फेऱ्यांत कपात; पावसाळी पर्यटनावर होणार परिणाम, इंधनदर वाढीचा फटका

Viral Video: विमानाची टक्कर झाली अन् हवेतच पॅराशूट फाटला... मृत्यूच्या दाढेतून 44 वर्षांची महिला थोडक्यात वाचली; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

Goa Fraud Cases: गोव्यातून थेट दुबईत ठोकली धूम! तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंडचा पोलिसांना चकमा; लुकआऊट नोटीस जारी

SCROLL FOR NEXT