Yuri Alemao And Amit Patkar Dainik Gomantak
Video

Goa Congress: भ्रष्टाचारी भाजप सरकारने 'गोवा बुडवला'! आलेमाव आणि पाटकर यांची घणाघाती टीका

गोव्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. अनेक ठिकाणी रस्ते खचले, दरडी कोसळल्या, विजेचे खांब कोसळले. वाहतूक ठप्प झाली.

Manish Jadhav

गोव्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. अनेक ठिकाणी रस्ते खचले, दरडी कोसळल्या, विजेचे खांब कोसळले. वाहतूक ठप्प झाली. राज्यात सध्या गंभीर परिस्थिती आहे. दोन्ही जिल्ह्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, यामधून सरकारचा हालगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. सरकारची खप्पा मर्जी असणाऱ्या कंत्राटदारांना रस्त्यांची कामे देण्यात आली. मात्र त्यांच्या हलक्या दर्जांच्या कामांमुळे रस्त्यांची वाट लागली. गोव्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्याप्रमाणात दरडी कोसळल्या. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली, भ्रष्टाचारी भाजप सरकारने गोवा बुडवला, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.

पुढे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सरकारवर सडकून टीका केली. सरकारच्या हालगर्जीपणामुळे गोव्याची वाट लागली असे यावेळी पाटकर म्हणाले. पाटकर पुढे म्हणाले की, 'अधिकाअधिक गोवा सरकारचे प्रकल्प मग ज्यामध्ये बांबोळी ते पत्रादेवी हायवे असो, फोंडा बायपास असो, वेर्णा ते कुठ्ठाळी बायपास असो इथे दरडी कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. विशेष म्हणजे, पेडणेमध्ये दर पावसाळ्यात दरडी कोसळण्यासारख्या घटना पाहायला मिळतात. कंत्राटदार आणि सरकार यांच्यातील लागेबंधामुळे गोव्याची दुरावस्था या पावसाळ्यात पाहायला मिळाली.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Porvorim Traffic Congestion: 'उन्‍नत'मार्गावर प्रगती, रस्त्यावर मात्र कोंडी

Jos Buttler World Record: 9 शतके, 107 अर्धशतके अन् 15000 धावा! टी-20 मध्ये बटलरने रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील पहिलाच फलंदाज VIDEO

Mapusa Kidnapping Case: दोन अपहरण प्रकरणे, दोन राज्यात तपास अन् चौघांची सुखरुप सुटका, म्हापसा पोलिसांची धडक कारवाई; एक संशयित गजाआड

SCROLL FOR NEXT