Belagavi Goa Via Anmod Ghat Dainik Gomantak
Video

Ravi Naik on Ghat Road: गोवा-बेळगाव महामार्गावरील घाट रस्त्यांचे काम एप्रिल २०२५ पर्यंत होणार पूर्ण

Belagavi Goa Via Anmod Ghat: अनमोड मार्गे बेळगाव ते गोवा दरम्यानचा सुमारे सात किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी कृषिमंत्री नाईक यांनी मंत्री नितीन गडकरी यांना केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Anmod Ghat

फोंडा: अनमोड मार्गे बेळगाव ते गोवा दरम्यानचा सुमारे सात किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे या मार्गाने वाहतूक करणे जिकिरीचे झाले असून हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी कृषिमंत्री रवी नाईक यांनी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांना केली होती. त्यानुसार एप्रिलपर्यंत हा रस्ता पूर्णपणे दुरुस्त केला जाईल अशी हमी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी नाईक यांना दिली आहे.

तिनईघाट ते अनमोड येथील सात किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे बेळगावहून गोव्यात होणारी मालवाहतूक तसेच प्रवासी वाहनांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. वाहने खराब होण्याचे प्रकार घडत असल्याने हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी रवी नाईक यांनी केली होती.

यासंबंधी नाईक यांनी १९ ऑक्टोबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठविले होते. त्याची दखल घेत गडकरी यांनी नाईक यांना २ नोव्हेंबरला पत्र पाठविले. आता १८ नोव्हेंबरला गडकरी यांनी पुन्हा पाठविलेल्या पत्रात यासंबंधीचे काम सुरू झाल्याचे नमूद करून एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल, अशी हमी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT