Goa Accident Dainik Gomantak
Video

Goa Accident: आरपोरा येथे भीषण अपघात, भटक्या जनावराच्या धडकेमुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी

Goa Accident News: गोव्यातील पर्यटन स्थळ असलेल्या आरपोरा परिसरात शनिवारी रात्री एका दुचाकीस्वाराला मोकाट जनावराची धडक बसल्याने तो गंभीर जखमी झाला.

Manish Jadhav

गोव्यातील पर्यटन स्थळ असलेल्या आरपोरा परिसरात शनिवारी रात्री एका दुचाकीस्वाराला मोकाट जनावराची धडक बसल्याने तो गंभीर जखमी झाला. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शनिवारी रात्री उशिरा आरपोरा-नेरुळ रस्त्यावर घडला. एक तरुण आपल्या दुचाकीवरून प्रवास करत असताना अचानक रस्त्यावर आलेल्या एका भटक्या जनावरासोबत त्याची जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की, दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला. यात त्याला डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर दुखापत झाली.

अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि जखमी तरुणाला उपचारासाठी तातडीने गोवा मेडिकल कॉलेज व रुग्णालय (GMC) येथे दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT