Goa Accident Dainik Gomantak
Video

Goa Accident: पणसुले धारबांदोडा ट्रक आणि कारचा भीषण अपघात; कारचालक ठार

Goa Fatal Accident: या कारचालकाचे नाव उत्तम सिन्हा (वय २३) असे असून तो हवेली कुर्टी येथील रहिवासी आहे.

Pramod Yadav

फोंडा: पणसुले धारबांदोडा येथील मुख्य रस्त्यावर रविवारी रात्री भरधाव कारगाडीची ट्रकला जोरदार धडक बसल्याने या अपघातातील जखमी कारचालकाचे निधन झाले. या कारचालकाचे नाव उत्तम सिन्हा (वय २३) असे असून तो हवेली कुर्टी येथील रहिवासी आहे.

रविवारी (०८ जून) मोलेहून फोंड्याच्या दिशेने येणाऱ्या जीए ०५ डी ४०४६ या क्रमांकाच्या भरधाव कारगाडीची धडक पणसुले येथे रस्त्यावर थांबलेल्या केए ३० ए ६२१३ या क्रमांकाच्या मालवाहू ट्रकला बसली.

अपघातात गंभीर जखमी उत्तम सिन्हा या कारचालकाला सुरवातीला तिस्क येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तेथून त्याला बांबोळी इस्पितळात अधिक उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथे त्याचे निधन झाले. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT